Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवार पासून कामबंद आंदोलनात सहभागी व्हावे : विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन राज्यसचिव हरिराम गित्ते

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
परळी वैजनाथ :- वीज कामगार, अभिंयते व अधिकारी व कंञाटी कामगार याना फ्रंटलाईन वर्करर्चा दर्जा दया व मेडिक्लेम योजनेत परस्पर नेमलेला टिपीए तात्काळ बदला या मागणीसाठी सोमवार, दि.24 मे रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे राज्यसचिव हरीराम गित्ते यांनी दिली आहे.

 वीज कर्मचारी,अभिंयते व अधिकारी सघंटना सयुंक्त कृती समितीची पदाधिकारी याची दि.१५.०५.२०२१ रोजी व्हिडिओ काॕन्फरन्स आॕनलाईन बैठक झाली.त्या बैठकीत राज्य सरकारने फ्रंटवर काम करणाऱ्या वीज कामगार,अभिंयते, अधिकारी व कंञाटी कामगार याना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दयावा व प्राधान्य देवुन लसीकरण करावे ही मागणी शासन व प्रशासनाकडे केली होती.माञ सरकार व प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेकडो वीज कामगार मुत्यु पावले तर हजारो कामगार व कुटूंबीय बांधित झालेले आहेत.गेल्या मा शवीज कामगार बाबत ऊर्जा विभाग व महाराष्ट्र शासनाचे नकारात्मक धोरण असताना सुध्दा कोरोना महामारीत वीज मार्च महिन्या पासुन जोखीम पत्करुन कोविद-१९ आजाराचा मुकाबला करत अविरत २४ तास वीज पुरवठा केल्यामुळेच, हाॕस्पिटल, पाणी पुरवठा दिवाबत्ती, लाॕपटाॕप मोबाईल चार्जगी,टि.व्ही,रेडीओ, इत्यादी सेवा सुरळीत चालु राहिल्या व महाराष्ट्रातील जनता व वीज ग्राहक घरात राहु शकले,अशी तात्काळ सेवा देत असताना ४०० च्या वर वीज कामगार,अभिंयते व कंञाटी कामगार मुत्यु पावलेले असुन हजारो कामगार व त्यांचे कुटूंबीय कोविद-१९ आजाराने ग्रस्त आहेत.या कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देवुन कोरोना प्रतिबंध लसीकरण प्रथम करावे या मागणी डाॕ.नितीन राऊत ऊर्जामंञी यांनी दुर्लक्ष केलेले आहे.सदया मागील वर्षी व यावर्षी कोकणात झालेले चक्रिवादळात विक्रमी वेळात वीज पुरवढा केला,सतत वीज निर्मिती,वहन व वितरण करणे सुरु ठेवले,मार्च महिन्यात विक्रमी महसुल गोळा केला असताना आता कामगार यांच्यावर वीज बिल वसुली मोहीम राबविणे यासाठी दबाव तञांचा वापर सुरु केलेला आहे. 
     तिन्ही कंपन्यात कामगार व कंपन्या यांच्या  सहभागातुन सन २०१५ पासुन सुरु केलेल्या महाराष्ट्र राज्य विघुत मडंळ सुञधारी कंपनी मेडिक्लेम पाॕलीसीत सन २०२० पासुन परस्पर मा.डाॕ.नितिन राऊत यांनी टिपिए नेमने,मेडिक्लेम पाॕलीसीस सन २०२१ करीता सुरुवातीला ३ महिनेच मुदतवाढ कामगार सघंटनाना विश्वासात न घेता देणे असा हस्तक्षेप सुरु केलेला आहे.सदया कोविद-१९ आजारावर हजारो कामगार, अभियंते व कंञाटी कामगार विविध हाॕस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.या माहामारीच्या काळात मेडी असिस्ट नविन टिपीएची नेमणूक केल्यामुळे प्रचंड असतोष वीज कामगार,अभिंयते, अधिकारी यांच्या निर्माण झालेला आहे.त्यामुळे मुख्यमंत्री निधीस मदत न करण्याचा मानस अनेक कामगार व अभिंयते याचा आहे.म्हणून दि.२४ मे २०२१ (सोमवार) पासुन काम बंद आदोंलनाचा करण्याचा निर्णय कृती समिती मध्ये सहभागी सहा सघंटनानी घेतलेला असुन आदोंलन काळात हाॕस्पिटल व इतर अत्यावश्यक सेवा यानाच विज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करण्यात येईल.इतर कोणतेही कामे करण्यात येणार नाही.
  आदोंलनामुळे औद्योगिक शांतता भंग झाली तर यास शासन व प्रशासन जबाबदार राहील. आदोंलनाच्या मागण्या.
वीज कामगार,अभिंयते व अधिकारी तसेच कंञाटी कामगार याना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देवुन शासना प्रमाणे सुविधा दया., फ्रंटलाईन समझुन वीज कामगार,अभिंयते,अधिकारी व कंञाटी कामगार,सर्व सहाय्यक,वीज सेवक व प्रशिक्षणार्थी  याचे व त्याच्या कुटूंबातील सदस्याचे प्रथम लसीकरण करावे., कोविद-१९ मुळे मुत्यु पावलेल्या वीज कामगाराना महाराष्ट्र शासना प्रमाणे रु.५० लाख अनुदान दयावे., तिन्ही कंपन्याकरीता एम.डी.इंडिया या जुन्याच टिपीए ची तात्काळ नेमणूक करावी., कोविद-१९ आजाराचा महाराष्ट्रात उद्रेक पाहता वीज बिल वसुली करीता शक्ती करु नये. या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन काॕ.मोहन शर्मा अध्यक्ष व काॕ.कृष्णा भोयर सरचिटणिस (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन-आयटक), जयप्रकाश होळीकर अध्यक्ष व शंकर पहाडे  सरचिटणिस (महाराष्ट्र वीज कामगार महासंघ-बिएमएस), रवी बारई अध्यक्ष व आर.टी.देवकांत सरचिटणिस (विघुत क्षेत्र तांञिक कामगार युनियन), अभि.केदार रेडेकर अध्यक्ष व अभि.सजंय ठाकूर सरचिटणिस (सबाॕर्डिनेट इंजिनियर अशोसिएशन), एन.के.मगर अध्यक्ष व सय्यद जहिरोदीन सरचिटणिस (महाराष्ट्र राज्य वीज तांञिक कामगार संघटना) जयप्रकाश छाजेड अध्यक्ष व दत्ताञय गुट्टे मुख्यमहासचिव (महाराष्ट्र राज्य वीज कामगार काॕग्रेस-इंटक) तसेच विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे राज्यसचिव हरिराम गित्ते यांनी केले आहे.
संकलन : महादेव गिते 

Post a Comment

0 Comments