Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आपले अपयश झाकण्यासाठी कोणत्याही कारणासाठी केंद्रावर टीका करणे बरोबर नाही : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- अशा संकटाच्या काळात कोणीच राजकारण करु नये. राज्य सरकारने एकत्रित काम करावे व आम्ही पण केले पाहिजे, परंतु या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपले अपयश झाकण्यासाठी कोणत्याही कारणासाठी केंद्रावर टीका करणे बरोबर नाही, असे वक्तव्य अहमदनगर दौ-यावर आलेल्या राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी (दि.4)पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, ते म्हणाले जर ऑक्सीजनचा साठा 1750 मे टन मिळत असेल तसेच देशात सगळ्यात जास्त लस  आपल्याला 4 लाख 35 हजार मिळत असतील आणि एवढ्या मिळूनसुद्धा केंद्रावर प्रत्येक गोष्टीला जबाबदार धरणे चुकीचे आहे.
तत्पूर्वी नगर जिल्हा व शहराबाबत कोविड परिस्थितीचा आढावा घेतला असून येथील परिस्थिती समजून घेतली आहे. खाटा उपलब्धता, वेंटिलेटर व सर्व माहिती घेतली असता या ठिकाणी बर्‍यापैकी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे, असेही श्री दरेकर म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दरेकर यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, शहराध्यक्ष भैय्या गंधे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
  दरेकर म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा 60 ऐवजी 50 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. 10 टन मिळत नाही असे सांगण्यात आलेले आहे. इंजेक्शनचा पुरवठा व्हायला पाहिजे व त्याच्यासाठी ज्या कंपन्या आहेत. त्यांच्याशी चर्चा करून नगरला जास्तीचा साठा उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले. 

Post a Comment

0 Comments