Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना तिसऱ्या लाटेबाबत मुलांवर गंभीर परिणाम होण्याचे संकेत नाही : एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया




ब्लॅक फंगस व कोरोनावर एकत्र उपचार करणे आव्हान आहे 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नवीदिल्ली- आतापर्यंत असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर गंभीर परिणाम होईल अथवा असे म्हटले जात होते की, याचा सर्वात जास्त मुलांवर परिणाम होईल. यासंदर्भात सोमवारी आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाबाबत घेण्यात आलेल्या आढावावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पञकारांशी बोलताना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग कमी दिसला आहे. आतापर्यंत असे दिसून येत नाही की, तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग दिसून येईल. असे म्हटले जात आहे की, मुलं सर्वात जास्त संक्रमित होतील, परंतु बालरोग असोसिएशनने म्हटले आहे की, हे फॅक्टवर आधारित नाही. याचा मुलांवर परिणाम होऊ नये, यासाठी लोकांनी घाबरू नये.

ब्लॅक फंगस संदर्भात बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले, कोरोनासह ब्लॅक फंगसचे प्रकरणे समोर येत आहेत. काळ्या बुरशीचे उपचार बराच काळ चालतो. बर्‍याच वेळा शस्त्रक्रिया देखील करावी लागते. काही लोक कोरोना पॉझिटिव्ह देखील असतात. उपचारादरम्यान, त्यांचा अहवाल निगेटिव्ह होतो. अशा परिस्थितीत रुग्णालयासमोर असे आव्हान आहे की,अशा रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार करावे लागत आहेत.


Post a Comment

0 Comments