Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुलाला मंत्री केलंत तसंच बहुजनांच्या मुलांच्या नियुक्त्या करा ; पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या प्रकारे आपण आपल्या मुलाला आदित्य ठाकरे यांना मंत्री केलंत तसेच आता बहुजनांच्या मुलांच्या शासकीय सेवेत नियुक्त्या करा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 
महाराष्ट्रात खुल्या वर्गातील आणि इतर वर्गातील युवकांना निकाल लागूनही शासकीय सेवेत नियुक्त करण्यात आले नाही. मराठा आरक्षणाच्या निकालामुळे या युवकांना अद्याप सेवेत घेण्यात आले नाही. परंतु नियुक्या मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असूनही सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर या नियुक्त्या कराव्या अन्यथा या बहुजन बांधवांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित बहुजन बांधवांच्या नियुक्त्यांची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठा आरक्षण रद्द झाले, ही वेदनादायी बाब आहे.यामुळे कधीही भरून न निघणारी जखम मराठा समाजाला झाली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने सरकारी भरती प्रक्रिया, शिक्षण क्षेत्रातील प्रवेश प्रक्रीया यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठा समाजातील तरूणांसोबतच आता इतर समाजातील इतर मागास वर्गीय, भटके विमुक्त, अनुसुचीत जाती व जमाती (OBC,vj,NT,SC,ST) प्रवर्गातील युवकांच्याही आयुष्याशी खेळ सुरू आहे. मी आपले लक्ष वेधून घेऊ इच्छीतो की, मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये जो आक्रोश आहे, तशीच अवस्था इतर मागास वर्गीय, भटके विमुक्त, अनुसुचीत जाती व जमाती मधील विद्यार्थ्यांची आहे.


Post a Comment

0 Comments