Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

...अशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाऊ शकते,याचे भविष्यकाळात मी अवलोकन करेल : खा.डाॅ. सुजय विखे पा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- कोविड सेंटरमध्ये डान्स घडलेल्या घटनेबाबत विचारले असता, खा.डाॅ सुजय विखे पा म्हणाले, मी डॉक्टर आहे, माझे पेशंट साठी जे पाहिजे ते करेल, ज्या सन्मानीय लोकांनी ज्या ठिकाणी सेंटर उघडले आणि पेशंटला अशा वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला. शेवटी पेशंट बरे झाले असतील, याचा मला आनंद आहे. डॉक्टर या नात्याने मलाच बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या अशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाऊ शकते,याचे भविष्यकाळात मी त्याचे अवलोकन करेल, असे कोणाचेही नाव न घेता खा. डॉ. विखे पा. यांनी शनिवारी महापालिकेचे नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान खा.विखे पुढे म्हणाले, राज्यात आमचे संख्याबळ नाही तशीच अवस्था नगरच्या महानगरपालिकेमध्ये आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आम्ही कोणताच निर्णय घेऊ शकत नाही, असे वक्तव्य भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. गेल्या वेळेस राष्ट्रवादीचे सहाय्य आम्ही घेतले तेव्हा राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात नव्हते, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
खासदार सुजय विखे म्हणाले, नगरच्या महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होत आहे. राज्यामध्ये जसे आमचे संख्या बळ नाही तसेच महानगरपालिकेमध्ये पण नाही व आमच्याकडे उमेदवार पण नाही. त्यामुळे आम्ही महापौरपदावर दावा करण्याचे काहीच कारण नाही. राष्ट्रवादीची साथ त्यावेळेला घेतली होती ही वस्तुस्थिती आहे, कारण त्या वेळेला राज्यामध्ये महाविकासआघाडी नव्हती. आता राजकीय समीकरणेही बदलली आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आलेले आहे. जसे मुख्यमंत्री होताना त्यांनी जसा निकष लावला होता, तसाच निकष ते इथे सुद्धा लावतील, अशी अपेक्षा आहे, असेही खा. विखे यांनी यावेळी सांगितले.
कोरोना सेंटरमध्ये काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या डान्सचा आस्वाद घेत आहे. ही नवीन पद्धत मला आज भावली गेले आहे, असा टोलाही कोणाही लोकप्रतिनिधींचे नाव न घेता त्यांनी यावेळी लगावला.
लसीकरण मोहीम सगळ्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे असे आम्ही येथील प्रशासनाला सांगितले आहे. काल शहरातील लसीकरण केंद्रांची जी यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये आता नव्याने बदल करण्यास सुद्धा सांगितले आहे. त्यानुसार आता प्रत्येक प्रभागांमध्ये मंगल कार्यालय निश्चित करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी उपकेंद्र तात्काळ सुरू केले जातील. लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना तात्काळ दिली जाईल, असा निर्णय बैठकीत झाला असल्याचे खासदार सुजय विखे यांनी यावेळी सांगितले.
नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत गेलेली होती. अनेक रुग्ण यामध्ये दगावले हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. या मृत्यूचा आकडा सुद्धा मोठा आहे. येथील प्रशासनाने कोरोनाच्या काळामध्ये काम केले आहे, ते अतिशय योग्य पद्धतीने केलेले आहे. कोणालाही नाव ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही, असेही खा. विखे यांनी म्हटले.


Post a Comment

0 Comments