Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पिंपरी चिंचवड आयुक्तानी वेषांतर करून पोलीस कर्मचारी कोरोनात सर्वसामान्यांशी कसे वागतात ते जाणले !

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
पुणे - पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी वेषांतर करून पोलिसांचा सर्वसामान्य नागरिकांबरोबर असलेला कार्यापद्धत जाणून घेतली. या दरम्यान आयुक्तांना पिंपरी पोलीस ठाण्यात अतिशय वाईट अनुभव आला. कोरोना साथीसारख्या संवेदनशील परिस्थितीतही पोलीस नागरिकांना त्यांच्या अडचणींमध्ये कशी मदत करतात हे आयुक्तांनी या वेषांतर दौ-यात जाणून घेतले.

बुधवारी (दि. 5) रात्री पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चेहऱ्यावर दाट झुबकेदार दाढी, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग लावून त्यावर पांढरी गोल टोपी परिधान केली. सलवार कुर्ता आणि मास्क असा वेष परिधान करून आयुक्त बनले ‘जमालखान कमालखान पठाण’. तर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे बनल्या त्यांच्या बेगम.

वेषांतर केलेले हे पठाण दांपत्य पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावर उतरले. सुरुवातीला आयुक्तांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल केला. ‘आमच्या शेजाऱ्याला कोविडसाठी रुग्णवाहिका पाहिजे होती म्हणून फोन केला तर तब्बल आठ हजार रुपये सांगितले’, अशी तक्रार त्यांनी केली. नियंत्रण कक्षातून ही माहिती पिंपरी पोलिसांना देण्यात आली. पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी जाण्याऐवजी तक्रारदार पठाण यांनाच पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
मध्यरात्री सव्वाबारा वाजता पठाण दांपत्य पिंपरी पोलीस ठाण्यात खासगी टॅक्सी करून गेले. ‘रुग्णवाहिकावाला आम्हाला लूटतोय, आमची तक्रार दाखल करून घ्या’, अशी मागणी पठाण दांपत्याने केली. त्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात असलेल्या पोलिसांनी पठाण यांना ‘हे आमचे काम नाही’ असे म्हणून झिडकारले. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस अशी वागणूक देत असल्याने पठाण झालेले पोलीस आयुक्त संतापले. त्यांनी तात्काळ आपली ओळख दाखवत संबंधित पोलिसांना विचारणा केली.
हा वाईट अनुभव घेऊन पठाण दांपत्याने पुन्हा नियंत्रण कक्षाला फोन करून वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दांपत्य असल्याचे सांगितले. हिंजवडी पोलीस ठाण्यात मध्यरात्री दीड, तर वाकड पोलीस चौकीत मध्यरात्री दोन वाजता पठाण दांपत्य झालेल्या आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी भेट दिली.
हिंजवडी पोलीस स्टेशन आणि वाकड पोलीस चौकीत त्यांनी ‘आम्ही आमच्या रमजानचे उपवास ठेवतो. परिसरात काही लोक रोज फटाके वाजवतात, त्याचा आम्हाला त्रास होतो. आम्ही काही लोकांना बोललो तर त्यांनी माझ्या बायकोची छेड काढली. मला कंबरेत लाथा घातल्या. आमची झटापट झाली त्यात एकाचा मोबाईल माझ्या हातात आला आहे’ अशी तक्रार केली.

Post a Comment

0 Comments