Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अॅलर्जीच्या खोकला...


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अॅलर्जीचा खोकला सुरू झाला की, त्याची उबळ थांबत नाही. लक्षणांचे निदानही लवकर होत नाही. हा खोकला नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमके काय करावे, हे रुग्णांना लक्षात येत नाही. त्यासाठी या खोकल्याची लक्षणे समजून घ्यायला हवीत.
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
अॅलर्जीचा खोकला सुरू झाला की, त्याची उबळ थांबत नाही. लक्षणांचे निदानही लवकर होत नाही. हा खोकला नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमके काय करावे, हे रुग्णांना लक्षात येत नाही. त्यासाठी या खोकल्याची लक्षणे समजून घ्यायला हवीत. एखाद्याला कोरडा खोकला होतो किंवा खोकल्यासोबत कफही बाहेर पडतो आणि पोलन सीझनमध्ये (परागीभवनाच्या मोसमात) किंवा जवळ प्राणी असतील, तर ही लक्षणे अधिक तीव्रतेने दिसून येतात. त्याचप्रमाणे सतत शिंका, नाक चोंदणे, घसा बसणे, थकवा, डोळे चुरचुरणे किंवा डोळ्यातून पाणी येणे ही याचीच लक्षणे आहेत.
👉उपचार कसे करावेत? -
अॅलर्जीच्या खोकल्याचे कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल आणि त्यानंतर ते योग्य उपचार सुचवतील. हे वैद्यकीय उपचार प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे इतर कुणाला अशा प्रकारच्या खोकल्यासाठी दिलेली औषधे स्वतः घेऊ नका. त्यामुळे इतर दुष्परिणाम होऊ शकतील.
👉अॅलर्जीचा खोकला दूर ठेवण्याच्या काही टिप्स- तुम्हाला ज्या घटकांची अॅलर्जी आहे ते घटक टाळा किंवा शरीरापासून लांब ठेवा. परागकण, बुरशी, प्राण्यांची विष्ठा, धुळीतील किड्यांपासून लांब राहावे.
📩डॉक्टरांनी सुचविलेली अॅलर्जीला प्रतिबंध करणारी औषधे घेतल्यास भरलेले नाक, वाहणारे नाक आणि नाकपुड्यांमधील सूज यांसारख्या लक्षणांपासून दिलासा मिळू शकतो.
📩डॉक्टरांनी सुचविलेले डिकन्जेस्टंट्स घेऊ शकता. त्यामुळे चोंदलेल्या आणि वाहणाऱ्या नाकाचा त्रास कमी होऊन दिलासा मिळेल.
📩घराबाहेर पडताना चेहरा झाकावा. जेणेकरून धूळ आणि परागकण टाळता येतील.
📩त्वचेची किंवा रक्ताची चाचणी करून घेता येईल.. त्यामुळे नक्की कशाची अॅलर्जी आहे, ते समजेल. काहींच्या बाबतीत या खोकल्याचे निदान करण्यासाठी फुप्फुसांचीच चाचणी, छातीचा एक्स-रे किंवा ब्रॉन्कोस्कोपी करण्याची गरज असू शकते.
📩अॅलर्जी होणाऱ्या घटकांबाबत सतर्क राहिले पाहिजे. डॉक्टर अँटि-अॅलर्जी औषधे सुचवू शकतात. हा कोर्स पूर्ण करावा.

🔊बाहेर पडण्यापूर्वी मास्क घालणे किंवा धूळ असलेल्या, अस्वच्छ ठिकाणी जाणे टाळावे.Post a Comment

0 Comments