Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बोधेगाव परिसरात वादळी वारा मेघगर्जनेसह पाऊसाने हजेरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बोधेगाव - शेवगाव पूर्व भागातील बोधेगाव सह परिसरात अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वारा मेघगर्जने सह पाऊसाने हजेरी लावली जोरदार वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा ही खंडित झाला आहे.
अहमदनगर जिल्यात हवामान खात्याने गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविला होता सर्वत्र उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर आलेली होती आज शनिवारी सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवू लागलेला होता पावसाचा अंदाज असल्यामुळे प्रशासनाने इशारा दिलेला होता आज शनिवारी सायंकाळी सात, साडे सातच्या सुमारास अचानकपणे ढग जमा होऊन बोधेगाव, बालमटाकळी, हातगावं, चापडगाव,ठाकूर पिंपळगाव, चेडे चांदगाव , लाड जळगाव, आदी भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली विजेचा कडकडाट सह पाऊस पडला होता पहिल्याच पावसामुळे सर्वत्र एकच धांदल उडाली गेली पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला व सखल भागात पाणी साचले होते, तर जोरदार पावसामुळे सर्वत्र वीज पुरवठा गायब होऊन विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळाला सर्वत्र अंधाराचे साम्राज्य झाले होते अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांची दाणादाण उडाली होती अचानकपणे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर शेतकऱ्यांनी हाती घेतलेल्या उन्हाळी बाजरी, कांदा, मका फळ, भाजीपाला व आदी पिकाला मोठा फटका बसला गेला आहे 
संकलन: बाळासाहेब खेडकर

Post a Comment

0 Comments