Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई ; गावठी हातभट्टी, देशी दारू, ताडी जप्त

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- भिंगार येथील घासगल्लीत विनापरवाना बेकायदेशीर गावठी दारू, देशी दारू व ताडीची विक्री करणाऱ्या अटक करून मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे. भाऊ उर्फ जय विठ्ठल भिंगारदिवे अशी पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्र. सपोनि शिशिरकुमार देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार भिंगार येथील घासगल्लीत छापा टाकून तीस हजार रुपयांची 300 लिटर गावठी हातभट्टी दारू, 2 हजार 834 रुपयांची देशी दारू बाबी संत्रा 109 बाटल्या आणि 3 हजार रुपयांची ताडी 200 फुगे प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. नगर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिशिरकुमार देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई सचिन रणशेवरे, पोहेकाॅ गोविंद गोल्हार, व्ही.जी. धामणे, पोना बी जी खेडकर, अंबादास पालवे,पोकाॅ सचिन धोंडे, मपोकाॅ एस पी साळवे, चापोकाँ अरुण मोरे, पोना हेमंत खंडागळे, सागर द्वारके, होमगार्ड देविदास उमाप, पांडुरंग गीते, प्रवीण दागडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments