Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दि.१ जूनपासून जीवनावश्यक वस्तूंची नगर बाजारपेठ सुरू करावी ; दि.अहमदनगर आडते बाजार मर्चन्टस् असो.ची जिल्हाधिका-याकडे मागणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - शहरातील अन्नधान्य, किराणा वस्तूंची बाजारपेठ सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील दि अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे व्यापारी प्रतिनिधी शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.२७) जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष झुंबरलाल बोथरा, उपाध्यक्ष अशोकलाल गांधी, पेमराज पितळे, संतोष बोरा, शांतीलाल गांधी, चांदमल मुथा आदींसह व्यापारी उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रामाणिक भावना ठेवून अहमदनगर शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवून सहकार्य केले आहे. जीवनावश्यक वस्तूंची अहमदनगरची बाजारपेठ बंद असल्याकारणाने तालुक्यातील बाजारपेठ वाढून अहमदनगरची बाजारपेठ कायमची बंद होण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे. व्यापाऱ्यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी धडपड करावे लागत आहे. शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे आर्थिक मदतीचे पॅकेज व्यापाऱ्यांना मिळाले नाही, अथवा कोणत्याही सवलतीचा निर्णय शासनाने घेतलेला नाही. सरकार कराराबाबत ही कोणतीही सवलतीचा निर्णय घेतलेला नाही. दरम्यान व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. प्रत्येक वेळेस असोशियनमार्फत व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे आदेश पाळण्याविषयी व्यापाऱ्यांना सूचना करण्यात येतात. परंतु आता व्यापाऱ्यांची सहनशीलता संपली असून दि.1 जूनपासून कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने उघडण्याचा निर्णय दि अहमदनगर आडते बाजार मर्चंट्स असो.ने घेतला आहे. तरी व्यापाऱ्यांचे नुकसान पाहता सरकारने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा निर्णय प्रशासनाने जाहीर करावा, असे निवेदनात असोसिएशनच्या व्यापा-यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments