Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मिरी करंजी गटाचा मिनी आमदार हरपला :-शिवाजी पालवे


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मिरी करंजी गटाचा गेली पधरा वर्षे सत्तेत राहीलेले नेते मोहनराव पालवे मिनी आमदार वाटायचे त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व, अंगात पांढरेशुभ्र कपडे,कपाळावर भला मोठा भगवा ,हातात पांढरी नॅपकिन,आणि तो कायमच सोबत असायचा कुठं बसायचं असलं की लगेचच खाली टाकायचा वर त्यावर बसायचं एक वेगळी च छाप होती पाथर्डी तालुक प्रमुख शिवसेना हे पद घेतल्यावर मोहनराव यांनी गाव तेथे शाखा काढली अहमदनगर जिल्हात सर्वात जास्त शाखा काढल्या मोहनराव पालवे हे कोल्हार गावचे सुपुत्र होते मोहनराव यांच्या शब्दावर गाव साथीला धावायच त्यामुळे एक वेगळा दबदबा होतो शेतकर्याच्या प्रश्नावर अनेक आंदोलन केले.

वांबोरी चारीचा सतत पाठपुरावा केला. मिरी करंजी च्या 32ते 35 गावात रस्ते केले बंधारे बनवले विजेचे प्रश्न सोडवले दुष्काळी पट्टात मोठ नेटवर्क तयार केले. अनेक तरूण राजकाणात आणले मोहनरावांच भाषण आमदार आणि मंत्र्याला लाजवेल अस असाच, मंत्रालयात ओळख असल्याने अनेक कामे ते सहज मंजुर करून होते मोहनराव यांचे सबंध लोकनेते गोपीनाथ मुंडे, शिवाजी कर्डिले, दिवंगत दिलीप गांधी, दिवगंत मंत्री बाळासाहेब विखे पाटील, माजीमंत्री बबनराव ढाकणे, शालिनिताई विखे, आ अरूणकाका जगताप असे अनेग दिग्गज नेतेशी जवळकी असायची मोहनराव पालवे यांनी ग्रामीण भागात अनेक एसटी बस सुरू केल्या ग्रामीण भागातला हा नेता सकाळी 8:00ते रात्री 9:00काम करायचा रात्री का दिवसा का शिवसैनिकचा फोन आला. नेता निघायचा कामाचा माणुस हरपला कोरोना हा खुप मोठा कहर केला कोल्हार गावची शान होती. अभिमान होत कोल्हार गावच पहिल लेकरू कोल्हुबाई मातेच्या आर्शिवादाचे मोठी झेप घेत होत. मोहनराव एकदा आमदार होतील अशी आशा होती. कोल्हुबाई मातेच्या गडावर मोहनरावांनी गावकर्यांच्या माध्यमातून तसेच अनेक लोकप्रतिधी कडून निधी आणून मोठा विकास केला कोल्हार गावच जे नुसाकान झाले. ते भरून निघू शकत नाही. परंतु आठवणीचा इतिहास नक्कीच दरवळत राहील. आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना करतो. देवा स्वर्गाच दार उघड कोल्हार चा राजा येतोय मा जि प सदसय स्व मोहनराव पालवे (बावला शेठ) यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ नगर, शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, सरपंच कोल्हार शिवाजी पालवे, आजिनाथ पालवे, विष्णु गिते, नवनाथ पालवे, अॅड संदिप जावळे, अॅड पोपट पालवे, अॅड गोररक्ष पालवे, मदन पालवे, अनिल पालवे, महादेव शिरसाट, भाऊसाहेब पालवे, निवृती भाबड, भाऊसाहेब करपे, जगन्रनाथ जावळे, संतोष मगर, संभाजी वांढेकर, मिरी करंजी गट समस्त ग्रामस्त कोल्हार.

Post a Comment

1 Comments