Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्जत पोलीस व पत्रकार यांची पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य तपासणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
कर्जत :- समाजाच्या सेवेत अत्यंत तत्पर असलेले मात्र समाजाचे ज्याचे कडे विशेष लक्ष नसते अशा पोलीस व पत्रकार यांच्या विविध प्रकारच्या तपासण्या कुटुंबिया सह आज कर्जत पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आल्या. समाजाच्या संरक्षणासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस हे सतत सतर्क असतात त्यामुळे त्याच्या मध्ये अनेक आजार बळावलेले असतात, सततचे जागरण, वेळी यावेळी जेवण, सतत असणारा हा कामाचा तणाव, लोकांच्या अपेक्षाचे ओझे अशा अनेक बाबी मुळे समाजातील पोलीस व पत्रकार या दोन महत्वाच्या घटकाना अनेक आजाराने ग्रासलेले असते मात्र कामाच्या ओघात त्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही व यातून अचानक एखाद्याला व्याधी पुढे उद्वल्यानंतर तेव्हा खूप उशीर झालेला असतो, समाजातील पोलीस व पत्रकार या दोन घटकांकडे समाजाचे म्हणावे असे लक्ष नसल्यानेच याबाबत विशेष काळजी घेत कर्जत पोलिस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतून पोलीस व पत्रकार यांची कुटुंबियासह विविध तपासण्या करण्याचे आयोजन करण्यात आले, सदर तपासण्या साई अद्वैत पॅथॉलॉजि लॅबोरेटरीचे दादा पाचरणे आणि त्यांचे मदतनीस अरविंद झाम्बरे, महेश झाम्बरे यांनी केल्या, कोणतेही उद्घाटन नाही, मान्यवर नाही तर थेट काम अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमात प्रथम महिलांची तपासनी करून सुरुवात झाली, यावेळी अनेक पोलीस व पत्रकार यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. शेवटी कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम शिंदे यांनी पोलीस निरीक्षक यादव व साई अद्वैत पॅथॉलॉजि लॅबोरेटरीचे दादा पाचरणे सर्व पोलीस व पत्रकारांच्या वतीने यांचे आभार मानले.
संकलन : आशिष बोरा

Post a Comment

0 Comments