Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रात्री सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करा : बोधेगाव ग्रामस्थांची मागणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर  रिपोर्टर 
बोधेगाव - शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे लहान मोठे दहा ते बारा दवाखाने आहेत. परंतु रात्री दहानंतर एकही दवाखाना उघडा नसतो . रात्री कितीही आवज दिला, बेल वाजवली, दरवाजा ठोठावला आणि कितीही मोठयाने ओरडले तरी दवाखाना उघडला जात नाही. त्यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना शेवगावला जावे लागते. अनेक वेळा ह्नदयविकाराच्या रुग्णाला प्रथम उपचार न मिळाल्याने शेवगावकडे जातांना रस्त्यातच अशा रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. येथाल अनेक डॉक्टरांची रुग्णालये असून रूग्णालया शेजारीच राहतात पण रात्री उठत नाहीत. त्यामुळे अशा डॉक्टरांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून रात्री रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश दयावेत अशी, मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान संतप्त तरुण कार्यकर्त्यानी ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. अरूण भिसे व पोलीस हवालदार भगवान बडधे यांना निवेदन देवून संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली. 

यावेळी मुस्लीम संघटनेचे युनुस पटेल, कुरेशी संघटनेचे अध्यक्ष बबन कुरेशी, आरपीआय अध्यक्ष संतोष बानाईत, आण्णाभाऊ हस्ती समितीचे अध्यक्ष भगवान मिसाळ, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष बन्नूभाई शेख, शाहुराव खंडागळे, सुगंध खंडागळे, गौतम, विनोद भोंगळे, विजय भोंगळे भोंगळे,रिपब्लीकन पँथरचे बाळासाहेब भोंगळे, सादिक पठाण, सुनिल बोरुडे, विष्णू मिसाळ, अविनाश खंडागळे, जमील शेख, लक्ष्मण मिसाळ, इत्यादी उपस्थित होते.
संकलन : बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments