Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अपघात करून पळलेला आरोपी अखेर जेरबंद ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- कामरगाव येथे अपघातात दोन व्यक्ती मयत झाल्या, यास जबाबदार असणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी चोरीच्या 5 लाखाच्या वाहनासह अटक करण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 9 मे 2021 रोजी नगर तालुका पो.स्टे 1 गुरनं. 233 / 2021 भादवि कलम 304(अ), 279,337,338,427 मो.वा.का.क. 184,134(अ) (ब) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी व नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.न. 216/2021 भा.द.वि.क.357,480 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी उमेश उर्फ ओंकार मधुकर शिंदे (रा. पिंपरी आंतरवन जि. बीड) नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधे त्याचे ताब्यातील चोरीचे वाहन ( क्र. MH 12 HN 8462) हे रस्त्याने भरधाव वेगात हयगयीने चालवून दोन व्यक्तींचा अपघात करुन त्यांचे मृत्युस कारणीभूत होऊन वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाला. सदरचा गुन्हा करुन तो आरोपी वाहनासह फरार झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रावाल, नगर ग्रामीण उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटोल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता.

गुन्हयाच्या तपासादरम्यान मिळालेल्या बातमीनुसार नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप, पोउपनि डी. आर जारवाल, पोना राहुल शिंदे, पोना अशोक मरकड, मपोना प्रमीला गायकवाड, पोकॉ धर्मराज दहिफळे यांच्या पथकाने आरोपी उमेश उर्फ ओंकार मधुकर शिंदे (रा. पिंपरी आंतरवन जि. बीड) यास अपघातातील वाहन (क्र. MH 12 HN 8462) सह आज दि. 10 मे 2021 रोजी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता सदर अपघातातील वाहन हे आरोपीने हिजवडी पोलीस स्टेशन हद्दीमधून गोदरेज कंपनीसमोरुन चोरुन आणल्याची कबुली दिली. त्याबाबत हिंजवडी पो.स्टे. जि. पुणे येथे गु.र.न.325/2021 भा.द.वि.क.379 दाखल असल्याने हिंजवडी पो.स्टे. चे गुन्ह्यातील 5 लाखाचे बोलेरो वाहनासह आरोपी मिळून आला आहे. सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागिय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोउपनि. डी. आर. जारवाल, पोना राहुल शिंदे, पोना अशोक मरकड, मपोना प्रमीला गायकवाड, पोकाॅ दहिफळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments