Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अश्लील व्हिडिओ बनवून कोटींची खंडणी, आरोपी महिलेसह एक अटक ; नगर तालुका पोलिसांची कामगिरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर –  शरीरसंबंध ठेवून आमीष दाखवून अश्लील व्हीडीओ बनवून ब्लॅकमेलिंग करून लाखो रुपये उकळणा-या महिलेसह एकास मोठ्या चाणक्षाने जेरबंद करण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणी तपासात मोठे 'हानीट्रॅपचे रॅकेट' उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पञकारांशी बोलताना सांगितले. यावेळी तपासी अधिकारी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेद्र सानप हे उपस्थित होते.
अपर पोलिस अधीक्षक अग्रवाल, तपासी अधिकारी सपोनि राजेद्र सानप व नगर तालुका पोलिसांचे पथक


फिर्यादीच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात भादंविक 394, 397,385, 120 (ब),34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपीकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 26 एप्रिल 2021 रोजी या गुन्ह्यातील आरोपींनी संगनमत करुन शरिरसंबधाचे अमिष दाखवून त्यांचेतील महिलेसबोत शरिरसंबध ठेवणेस भागपाडून त्याचे अश्लील व्हीडीओ बनवला होता. एक कोटी रुपये आणून दे नाहीतर तो अश्लील व्हीडीओ हा पोलीसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी आरोपी महिलेने दिली होती. फिर्यादीच्या गळ्यात असणारे 5 तोळे वजनाची 2 लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन, हातातील साडेसहा तोळे वजनाच्या 4 अंगठ्या व रोख रक्कम 84 हजार 300 रुपये असा एकूण 5 लाख 44 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी महिलेसह तिला मदत करणा-यास अटक करण्यात आली आहे. दि.15 मे 2021 रोजी नगर तालुका सपोनि राजेद्र सानप यांनी पोलीस पथकासह जखणगाव येथे राहणारी आरोपी महिला हिस ताब्यात घेऊन तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. यावेळी सदरचा गुन्हा हा तिने व तिचा साथीदार मिळून केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेच्या साथीदारास तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. महिलेने सदरची चेन ही भिगार अर्बन बँक येथे तिने तिच्या भावाच्या नावे गहाण ठेवली होती. ती बँकेतून ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच तिच्या घरामध्ये सदर गुन्ह्यातील अंगठी व रोख रक्कम 69 हजार 300 रुपये जप्त करण्यात आली. तिचा साथीदार याचेकडून गुन्ह्यातील 15 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांचयांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेद्र सानप यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोउपनि आर.एन.राऊत, पोहेकाॅ बापूसाहेब फोलाणे, भगवान गांगर्डे, शैलेश सरोदे, संतोष लगड, पोना योगेश ठाणगे, अशोक मरकड, धर्मनाथ पालवे, मपोना प्रमिला गायकवाड, पोकाॅ धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे, मपोकाॅ गायञी धनवडे, मोहिनी कर्डक, राजश्री चोपडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments