Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिका-याकडे दोन पेट्या नोटा ; मोजता मोजता अधिकाऱ्यांची दमछाकऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
तिरुपती: आंध्रपदेशात तिरुमालामधील तिरुपती मंदिराजवळ अनेक दिवसांपासून भिक मागणाऱ्या एका भिकाऱ्याकडे लाखो रुपये सापडले आहेत. त्याच्या घरातील दोन पेट्या भरून नोटा सापडल्या असून, त्या नोटा मोजता मोजता अधिकाऱ्यांची मोठी दमछाक झाली असल्याचे समोर आले आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, 64 वर्षीय श्रीनिवासन हा भिकारी तिरुमाला या ठिकाणी येणा-या यात्रेकरुंकडून भिख मागत असे, जोपर्यंत याञेकरूकडून भीख मिळत नाही, तोपर्यंत तो त्यांच्या मागेमागे फिरत असे. तिरुपतीचं दर्शन घेऊन आलेल्यांच्या कपाळाला तो टिळा पण लावत होता, असे केल्याने त्याला याञेकरूकडून दक्षिणा मिळत असे. त्यांच्याच घरात आता लाखो रुपये सापडले आहेत. काही दिवसांपासून काही लोक शेषाचलनगर येथे असणा-या श्रीनिवासन याच्या घरावर कब्जा घेण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्याकडे लाखो रुपये आहेत, असा या लोकांना अंदाज होता. यामुळे श्रीनिवासन या भिका-याच्या मृत्यूनंतर शेजारी राहात असणा-यांनी 'टीटीडी'च्या अधिकारी व स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस व टीटीडी अधिकारी घटनास्थळी येऊन त्यांनी श्रीनिवासन याच्या घरातून दोन पेट्या जप्त केल्या. त्या पेट्या उघडताच आत नोटा दिसल्या. त्या दोन्ही पेट्यामध्ये नोटाच नोटा होत्या. श्रीनिवासन याच्यामागे कुणीच नसल्याने त्याच्या संपत्तीवर कुणीही दावा करू शकणार नसल्याचं माहित असल्याने व्हिजिलन्स आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही पेट्यातील पैशांची मोजल्या असत, एकूण 6 लाख 15 हजार 50 रुपये मिळून आले. श्रीनिवासन हा तरुण असतानाच तिरुपती येथे आला होता. त्याची तिरुपती बालाजीवर मोठी श्रद्धा होती. त्याचा स्वभाव चांगला होता. येथे येणारे याञेकरू मोठ्या श्रद्धेने त्याच्या हातूनच डोक्यास टिळा लावून मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडायचे, असे स्थानिकांकडून सांगण्यात येते.


Post a Comment

0 Comments