Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

टोसिलुझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार ; नाशिकतून दोघे ताब्यात

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नाशिक - राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक रुग्णालयांमध्ये औषधांचा काळाबाजार सुरु झाला आहे. दरम्यान कोरोना रुग्णांना उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या अत्यावश्यक औषधांपैकी एक असणाऱ्या टोसिलुझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकमधील गंगापूररोड परिसरातून दोघांना शाखा युनिट २ चा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान संशयितांच्या ताब्यातून एक इंजेक्शनची बाटली जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनासाठी अत्यावश्यक सेवेत मोडणारी औषधे काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याचा घटना वारंवार घडत आहेत. असाच काहीचा प्रकार बुधवारी गंगापूर रोडवर उघडकीस आला. राज्य सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पातळीवर प्रयत्न करण्यात आले मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. दरम्यान नाशिकचा या ठिकाणी एका रुग्णालयाबाहेर इंजेक्शन काळाबाजारात विकण्यासाठी काही संशयित येणार असल्याची माहिती नाशिक पोलिसांचा गुन्हे शाखा युनिट २ ला मिळाली होती.


Post a Comment

0 Comments