Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

📲 विकेल ते पिकेल अभियान🧊ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
👉विकेल ते पिकेल अभियानांतर्गत आतापर्यंत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री ( संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान) अंतर्गत ९७०२ ठिकाणी विक्री केंद्र उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच ८१८९ शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट खरेदीदारांशी जोडण्यात आले.
👉या अभियान अंतर्गत बाजारात मागणी असलेले तथा नाविन्यपुर्ण पिकाखाली १ लाख ६० हजार हे. क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये जिरेनियम, सिट्रोनेला, किन्होव्हा, ओवा, अँव्होकॅडो, ड्रगन फ्रुट, विदेशी भाजीपाला, करटोली, एरंडी, तुती, ब्राऊन राइस, काळी मिरी, करडई, जवस, तीळ इ. पिकांचा समावेश आहे. 
👉राज्यामध्ये दि. ०९ ऑगस्ट २०२० रोजी ३३ जिल्हास्तरावर व २३३ तालुका स्तरावर रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या व्यतिरिक्त ११९ ठिकाणी कायमस्वरूपी विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे सबळीकरणाचे धोरण आखण्यात आले आहे. 
👉कौशल्यावर आधारित काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी महत्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.या कार्यक्रमांतर्गत १ लाख शेतमजूरांना प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित असून सन २०२०-२१ मध्ये ५८७ प्रशिक्षण वर्ग आयोजित करून २५ हजार ६८८ शेतकरी /मजूर यांना प्रशिक्षण देण्यात आले. 

📩राज्यातील कृषि विस्तार
👉अर्ज एक योजना अनेक याप्रमाणे महा डीबीटी पोर्टल वरुन कृषि विभागाच्या योजनांची अमलबजावणी प्रथमच सुरू.दिनांक १८ मे २०२१ पर्यंत १३ लाख १९ हजार ३१४ शेतकर्यांनी २७ लाख २८ हजार ८७ घटकांसाठी अर्ज केले आहेत. त्यातून लॉटरी प्रक्रियेतून २ लाख ४९ हजार ८६८ एतक्या अर्जांची निवड झाली आहे. शेतकऱ्यांना पारदर्शकपणे व कमी त्रासात लाभ मिळण्याची सोय झाली आहे. 
👉कृषि विभागाच्या सर्व योजनांमध्ये सर्व प्रवर्गातील ३० टक्के लाभ प्राधान्याने महिलांना देण्याचे धोरण आहे. 
👉शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकप्रतिनिधी, कर्मचारी व कृषितज्ञ यांचा सहभाग असलेली ग्राम कृषि विकास समिती स्थापना करण्यात आली असून सद्यस्थितीत १३ हजार ८१९ गावांमध्ये ग्राम कृषि विकास समिती स्थापन झालेल्या आहेत. त्यांच्या मदतीने प्रथमच ग्राम स्तरावर कृषि विस्तार आराखडा तयार करण्याचे काम सुरू. 
👉सन २०२१-२२ पासून कृषि क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांसाठी ६७ ऐवजी ९९ कृषि पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात युवा शेतकऱ्यांसाठी युवा शेतकरी पुरस्कार व कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार दिला जाणार आहे. 
👉राज्यातील शेतकऱ्यांमध्ये तालुकस्तरावर पीकस्पर्धा घेणार त्याव्दारे उत्पादनात वाढ व तंत्रज्ञान प्रसारास चालना मिळणार आहे
👉राज्यात ५००९ पुरस्कार प्राप्त व पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांची रिसोर्स बँकेची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा वापर करून इतर शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. 
👉पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी केल्याने केंद्रशासनाने महाराष्ट्र राज्यास प्रथम क्रमांकाचे तीन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
👉कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर प्रत्यक्ष सभा, बैठकांवरील प्रतिबंध विचारात घेऊन आधुनिक कृषि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी सन २०२०-२१ मध्ये एकूण २० हजार २२ शेतीशाळा राबविण्यात आल्या आहेत. त्यापैकी ११३६ महिला शेतीशाळा घेण्यात आल्या.
👉सन २०२१-२२ मध्ये कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी बीज प्रक्रिया मोहीम, बीज उगवण क्षमता तपासणी मोहीम, बीबीएफ वर लागवड, १० टक्के रासायनिक खत बचत मोहीम इ. तंत्रज्ञान प्रसार मोहिम हाती घेण्यात आल्या आहेत.
👉कापूस पिकासाठी एक गाव एक वाण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामुळे एकाच गुणवत्तेचा कापूस तयार होऊन शेतकऱ्यांना चांगले दर मिळण्यास मदत होईल. 
👉आंतरपिकाचे महत्व विचारात घेऊन कडधान्याचे १ लाख ९० हजार हेक्टर व गळीतधान्याचे ५० हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर कडधान्य व गळीतधान्य पिकाचे आंतरपिकास प्रोत्साहन देण्यात येत आहे. याकरिता बियाणे मिनीकिटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. 
📩इतर उपक्रम
👉आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विशेषत: उपग्रहाद्वारे छायाचित्रण व ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यातील पिकनिहाय क्षेत्राची अचूकपणे गणना करणे, लागवड केलेल्या पिकांचे आरोग्य सर्वेक्षण करणे व पिकांचे काढणी पश्चात येणारे उत्पादनाचे अनुमान (Yeild estimate) काढणेसाठी कृषि विभाग महाराष्ट्र शासन व एमआरएसएसी, नागपुर यांच्या संयुक्त विद्यामाने महाॲग्रीटेक प्रकल्प सुरू आहे.
👉लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करणेसाठी २१०० कोटी रूपयांचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ५४ शेतकऱ्यांच्या समुदाय आधारीत संस्थांच्या रु.६८.१४ कोटी इतक्या किंमतीच्या २९ पथदर्शी उपप्रकल्पांची अंमलबजावणी सुरू असून यामधून ६५ हजार शेतकऱ्यांना लाभ अपेक्षित आहे. 
👉निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या संयुक्त विद्यमाने ४ हजार कोटी रूपयांचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पातील वैयक्तिक लाभाच्या बाबीं खर्च : रु. ७६१.७४ कोटी, मृद व जलसंधारण कामे खर्च: रु. १२.१२. कोटी, शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्थसहाय्य: रु. २०.४६ कोटी या बाबीवर खर्च करण्यात आले आहेत. 
👉नाबार्डच्या पत आराखड्यानुसार ७९ हजार १९० कोटी रुपये इतके पीक कर्ज व ४८ हजार १४८ कोटी इतके मुदत कर्ज व पायाभूत सुविधा करिता कर्ज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
👉जिल्हास्तरावरील पालकमंत्र्यांच्या खरीप आढावा बैठकीमध्ये बियाणे, खते, पीक कर्ज, पीक विमा, वीज जोडणी, नैसर्गिक आपत्ती व नुकसान भरपाई, फळबाग लागवड इ. विषयांवर उपस्थित झालेल्या मुद्यांच्या अनुषंगाने कृषि विभागातर्फे कार्यवाही करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments