Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या, जयंत पाटल यांची पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणीऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्ताने जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी केली आहे. जयंत पाटलांनी यापुर्वीही मोदींकडे भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्यात येण्यासाठी मागणी केली आहे.


भाऊराव पाटील यांनी संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या शिक्षणासाठी समर्पित केले आहे त्यामुळे त्यांना भारतरत्न देण्याची मागणी जयंत पाटील यांनी केले.
जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून तीन वर्षांपूर्वी मागणी केली आहे. तर आता त्याच पत्राचे ट्विट जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुन्हा मागणी केली आहे. जयंत पाटलांनी ९/५/२०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भाऊराव पाटील यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केली आहे. या पत्रात जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी आपले संपुर्ण जीवन बहुजना समाजाच्या शिक्षणासाठी समर्पित केले आहे. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देण्याचा त्यांचा हेतु होता. अजूनही त्यांनी स्थापित केलेल्या संस्थेमार्फत शिक्षण सेवा सुरु असून चांगल्या दर्जाचे शिक्षण मुलांना देत आहेत. महात्मा गांधी यांनीही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची दखल घेत प्रशंसा केली होती.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करुन आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. भाऊराव पाटील यांच्यामुळे अनेक तरुणांच्या आयुष्य वेगळ्या वळणाला लागले आहे. तरुणांना पुढील वाटचालाची दिशा दाखवली आहे. यामुळे भाऊराव पाटील यांना भारतत्न पुरस्कार द्यावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुन्हा मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments