Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्याला लसीकरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे केली मागणी-आ. संग्राम जगताप

 स्थायी समितीचे मा.सभापती मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून देवी रोड परिसरात लसीकरण केंद्राचा शुभारंभ
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - नगर जिल्हा विस्ताराने व लोकसंख्येने खुप मोठा आहे.त्यातच नगर जिल्ह्यावर कोरोना संसर्ग विषाणूचे मोठे संकट ओढवले आहे.दररोज कोरोनाचे हजारो रुग्ण सापडत आहे. दुर्दैवाने काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे,या कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येक नागरिक भयभीत झाला आहे. दुर्दैवाने काही कोरोना बाधित रुग्ण भीतीपोटी आपला जीव गमावत आहे.आता प्रत्येक नागरीका समोर एकच आशेचा किरण आहे की, लवकरात-लवकर कोरोना प्रतिबंधक लस टोचून मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडे लसीकरणाचा मोठा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून आज देवी रोड परिसरात लसीकरणाला सुरुवात केली असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

केडगाव देवी रोड येथील सरस्वती प्राथमिक विद्यालय येथे नगरसेवक मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून लसीकरण केंद्राचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती लताताई शेळके,नगरसेवक राहुल कांबळे,जालिंदर कोतकर,माजी नगरसेवक सुनील कोतकर,सुनीलमामा कोतकर,डॉ.गिरीश दळवी,सुरेश बनसोडे ,अफजल शेख,भूषण गुंड,सोनू घेंमुड,बच्चन कोतकर ,संदीप भोर ,प्रसाद जमदाडे ,उमेश कोतकर, उमेश ठोंबरे, कानिफनाथ कानगुडे,विजय सुंबे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की,केडगांव उपनगर हे नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर असून या भागामध्‍ये मोठया प्रमाणात लोकवस्‍तीचा विस्‍तार झाला आहे.  गेल्‍या महिन्‍याभरापासून केडगांव मध्‍ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत आहे. याचबरोबर दुर्देवाने अनेकांचा मृत्‍यू झाला आहे. त्‍यामुळे नागरिकांमध्‍ये भितीचे वातावरण पसरले आहे; केडगांव मधील नागरिक मळयांमध्‍ये मोठया प्रमाणात राहत असून एकच आरोग्‍य केंद्र असून या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी आ.संग्राम जगताप यांच्याकडे प्रयत्न केला. एकाच आरोग्य केंद्रांमध्ये एकच लसीकरण केंद्र असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली होती म्हणून आज केडगाव देवी रोड परिसरामधील सरस्वती विद्यालय येथे दुसरे लसीकरण केंद्र सुरू केले. या लसीकरण केंद्रावर नियोजनानुसार गर्दी न करता लसीकरण केले जाणार आहे,तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments