Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवा : अंबादास ढाकणे

 

लसीकरण मोहिमेला लागतोय वारंवार ब्रेक; लाभार्थ्यांची हेळसांड.....!
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव - कोरोनाच्या लढयात लसीकरण मोहिमेला विशेष महत्व देण्यात आले असून ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या पाहून जेष्ठासह युवकांनी देखील लस घेण्यासाठी मोठी स्पर्धा केल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे. याच अनुषंगाने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण चालू असून सदरील लसीकरण हे लोकसंख्याच्या तुलनेत फार कमी प्रमाणात ढोस उपलब्ध होताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरा पेक्षा ग्रामीण भागातच कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या लसीचा पुरवठा हा अत्यंत मुबलक प्रमाणात होत असून जास्तीत जास्त कोरोना लसीचे ढोस वाढवावे, तसेच गावोगावी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात देखील कोरोना लसीकरण सुरू करून लसीकरनाचे ढोस जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून लसीकरणचा वेग वाढवावा जेणे करून लस घेण्यासाठी लाभार्थ्यांची हेळसांड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अंबादास ढाकणे यांनी म्हटले आहे.

श्री ढाकणे पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोनाच्या लसीकरनाबाबत जनजागृती यासह आदी उपाययोजना करण्याबाबत ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ही कमी पडत असून जास्तीत जास्त यंत्रणा ही कशी वाढवता येईल. याकडे प्रशासनाने लक्ष घालणे महत्वाचे आहे तसेच राज्य सरकारने देखील प्रत्येक ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालयासह प्रत्येक गावातील असणाऱ्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच्या ठिकाणी दररोज किमान २५० ते ३०० लसीचे ढोस पुरवठा केला तरच कोरोनावरती यशस्वीरित्या आपण मात करू शकतो हे लक्षात घेऊन राज्य शासनाने लवकरच वरील आदेशाची अंमलबजावणी सुरू करावी. तसे केले तरच लोकांचे जीव वाचतील तसेच सदरील होणाऱ्या लसीकरण यामध्ये कोणीही राजकारण करू नये, जनतेच्या जीवाशी खेळू नये होणाऱ्या लसीकरनाबाबत सर्वांनी सहकार्य करावे असे, आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अंबादास ढाकणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments