Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजप खासदार असताना माझ्यासह बड्या नेत्यांचा फोन टॅप : नाना पटोले

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई- राज्यात मागील काही महिन्यांपासून फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण भाजप खासदार असताना २०१६-१७ मध्ये फोन टॅप झाल्याचा दावा केला आहे. माझ्यासोबत भाजपच्या बड्या नेत्यांचा, शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा फोन टॅप करण्यात आला होते, असेही श्री पटोले यांनी म्हटले आहे. फोन टॅप करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. या प्रकरणी नंबर माझा व अमजद खान असे खोटे नाव वापरण्यात आले होते. या फोन टॅपिंगशी संबंधीत सर्वांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

याबाबत पटोले म्हणाले की, फडणवीस सरकारच्या कालावधीत माझ्याबरोबरच राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेतील अपवाद नेते आणि काही आयएएस, आयपीएस अधिकारी यांचेही फोन टॅपिंग केले जात होते. माझा संबंध अंमली पदार्थांच्या तस्करीशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला.
फोन टॅपिंग करताना नावे व पत्ते खोटी तसेच बनावट दाखवून फोन टॅप करण्यात आले. हे फोन टॅपिंग कोणी केले आणि त्यांना परवानगी कोणी दिली ? फोन टॅपिंग करण्याचा उद्देश काय होता ? फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे असून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे खपवून घेणार नाही. जे कोणी या फोन टॅपिंगशी संबंधीत होते त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी, असेही पटोले म्हणाले.
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी फोन टॅप होण्याचा आरोप केला होता. मात्र, फोन टॅपिंग कोणाकडून केले जात आहे, याबाबत कोणतीही माहिती किंवा कोणाचेही नाव घेण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी आपला फोन टॅप होत असल्याचे यापुर्वीही सांगितले होते.

👉कसे होतात फोन टॅप -
राज्य सरकार, प्रशासनाच्या परवानगीशिवाय अन्य कोणतीही व्यक्ती कोणाचाही फोन टॅप करु शकत नाही. फोन टॅप करण्यासाठी राज्य सरकारकडून परवनागी घ्यावी लागते तसेच वैध कारण द्यावे लागते. तसेच देशांतर्गत शांती, सुरक्षितता राखण्यासाठी, परकीय देशांसोबत असलेले घात मैत्री संबंध, देशात घडणारा गंभीर गुन्हा रोखण्यासाठी फोन टॅप करण्यात येतात.

Post a Comment

0 Comments