Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिलेला अश्लील मेजेस टाकणा-या पोलिस कर्मचा-यावर गुन्हा दाखल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - पोलीस कार्यालयात कार्यरत असणा-या पोलीस कर्मचार्‍याने आपल्या मित्राच्या आईलाच अश्लील मेसेज टाकून, लज्जा उत्पन्न होईल अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आल्याने संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या विरुद्ध येथील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान  आज मदर्स डे च्या दिवशी असा प्रकार घडल्यामुळे पोलीस दलात असे कृत्य झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रामदास जयराम सोनवणे (वय  41 पोलीस नाईक, तोफखाना) असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,रामदास सोनवणे हा तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असताना, सोनवणे याने त्याच्या मित्राच्या आईला गेल्या पाच दिवसापासून टेक्स्ट मेसेज पाठवले. लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन तो त्यातून करायचा. विशेष म्हणजे संबंधित महिलाही या प्रकाराला वैतागून गेलेली होती. ही हकीगत महिलेने तिच्या मुलाला सांगितली. संबंधित महिलेने याची कल्पना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना दिलेली होती. शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी तात्काळ या प्रकरणा संदर्भामध्ये तोफखाना पोलिसांशी संपर्क करून संबंधित प्रकार काय आहे याची खात्री करून तात्काळ गुन्हा दाखल करा, अशा प्रकारचे निर्देश दिले होते. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी संबंधित महिलेला आलेले मेसेज या सर्व बाबींची शहानिशा केली. संबंधित पोलिसाने त्या महिलेला अश्लील मेसेज पाठवून तिच्याशी फोनद्वारे गेल्या पाच दिवसांपासून लज्जा उत्पन्न होईल अशी मागणी त्याने केली होती. तसे त्याने व्हाट्सअपद्वारे सुद्धा काही मेसेज पाठवलेले होते. पाठवलेले मेसेजवर पाहिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर येथील तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये सोनवणे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत. या संदर्भामध्ये पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी संबंधित पोलिसाला ताब्यात घेऊन त्याचा अहवाल अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. आज मदर्स डे चे औचित्य साधून जो प्रकार घडला त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, पोलीस दलाला काळीमा फासण्याचा प्रकार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Post a Comment

0 Comments