Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्जत नगर पंचायतला ओडीएफ प्लस प्लस मानांकन

 


स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 
केंद्र सरकार कडून गौरव
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत :- कर्जत नगरपंचायतीस स्वच्छ भारत अभियानांतर्गत देण्यात येणारे ओडीएफ प्लस प्लस हे मानांकन प्रथमच प्राप्त झाले असल्याची माहिती कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली आहे. 

केद्र सरकारच्या वतीने देशास हगणदारी मुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापन करणे यासाठी सन २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानास गती मिळावी या उद्देशाने देशातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा सन २०१६ पासून सुरु करण्यात आली. दरवर्षी केद्र सरकार तर्फे ही स्पर्धा घेतली जाते, याचा एक भाग म्हणून कर्जत शहरातील व उपनगरासह सार्वजनिक ठिकाणे व बस स्टँड येथील शौचालयाची पाहणी केली होती, त्याआधारे कर्जत नगर पंचायतीस केद्र सरकारचे ओडीएफ प्लस प्लस हे मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या पथकाव्दारे दि २५ व २६ फेब्रुवारी २०२१ रोजी शहरातील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करण्यात आली होती, केंद्र सरकारचे सर्व निकष पूर्ण करत असल्याने कर्जत नगरपंचायतीस ओडीएफ् प्लस प्लस मानांकन मिळल्याचे जाहीर झाले आहे. शहरासाठी प्रथमच हे मानांकन मिळवून देण्यासाठी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली, या या यशाबद्दल कर्जत नगर पंचायतीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

संकलन : आशिष बोरा, कर्जत 

Post a Comment

0 Comments