Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भातोडीत नृसिह जयंतीनिमित्त ऑनलाईन प्रवचन सेवा - श्री क्षेत्र नृसिह देवस्थान भातोडी या फेसबुक पेजवर ऑनलाईन प्रवचन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : नगर तालुक्यातील भातोडी येथे भगवान नृसिंह मंदिरात नृसिंह जयंती निमित्त दरवर्षि नाम सप्ताह उत्साहात साजरा होतो. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे यावर्षि सर्व शासकिय नियमांचे पालन करून जयंती उत्सव ऑनलाईन साजरा करण्यात येत आहे . बुधवार दि. १९ मे पासून या सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. 

रोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ऑनलाईन प्रवचन सेवेचा उपक्रम सुरू आहे. काल बुधवारी (दि.१९) ह.भ.प.संजय टाक यांची प्रवचन सेवा झाली. आज गुरुवारी मच्छिंद्र लबडे महाराज, शुक्रवारी अशोकानंद कर्डीले महाराज, शनिवारी बबन महाराज गिरी, रविवारी बबन महाराज मगर, सोमवारी ज्ञानेश्वर कदम महाराज, मंगळवारी आदिनाथ महाराज गिरी तर २६ मे रोजी भागवत महाराज उंबरेकर यांचे प्रवचन होणार आहे. याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले. श्री क्षेत्र नृसिह देवस्थान भातोडी या फेसबुक पेजवर हा ऑनलाईन प्रवचनाचा सोहळा सर्वांना पाहता येईल.

Post a Comment

0 Comments