Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संगमनेर पोलिसांवर झालेल्या हल्ला प्रकरणी कठोर कारवाई करावी ; विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -संगमनेर पोलिसांवर मुस्लिम समुदाया कडून झालेल्या हल्ला प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष घालून वचक बसेल अशी कठोर कारवाई करावी.अश्या मागणीचे निवेदन विश्व हिंदुपरिषदे तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले.

याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र धर्मप्रसार प्रमुख मिलिंद मोभारकर, जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे, कार्याध्यक्ष अँड जय भोसले, शहरमंत्री मुकुल गंधे, बजरंग दलाचे जिल्हा अध्यक्ष गौतम कराळे, प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर आदी उपस्थित होते. भारतीय संविधानाच्या कलम २१ नुसार निर्भीड व मुक्त जीवन जगण्याचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे.या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे.सध्या राज्यात व आपल्या जिल्ह्यात कडक लॉकडाउन घोषीत करण्यात आलेला असून त्याची अंमलबजावणी मुस्लीम समाजा व्यतिरिक्त इतर समाजा वर दंडुके उगारून वा दंड आकारून काटेकोरपणे केली जात असल्याचे चित्र आहे.
नामदार बाळासाहेब थोरात यांचे राजकीय वर्चस्व असलेल्या संगमनेर शहरात,कर्तव्य बाजावणीस गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर मुस्लीम समुदाया कडून दगडफेक करून मारहाण केल्याची घटना ताजी आहे.या प्रकरणात नामदार बाळासाहेब थोरात व पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय दबावा पोटी सदर घटनेत आरोपीं विरुद्ध, पोलीस प्रशासना कडून कोणतीही कडक व ठोस् कारवाई होताना दिसून येत नाही.त्यामुळे जिथे पोलीस प्रशासनातील पोलिसच जर सुरक्षित नाहीत,व त्यांचे वरीष्ठ अधिकारी राजकीय दबावाखाली असतील.असे पोलीस प्रशासन नागरिकांच्या निर्भीड,सुरक्षीत जीवन जगण्याचा घटनादत्त अधिकाराचे कसे काय संरक्षण करणार ? याचा घोर प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी आमची आपणा कडे मागणी आहे कि आपण स्वतः या प्रकरणी जातीने लक्ष घालून,सर्व आरोपींना अटक करून,आपल्या मार्गदर्शना खाली तपास करून तातडीने दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करावे.अन नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील उडत चाललेला विश्वास पुनर्स्थापित करावा.अशी मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
संकलन : अमोल भांबरकर

Post a Comment

0 Comments