Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरसेवक बडे व सप्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मनपा आयुक्तांची भेट ; २ दिवसात पाणी देण्याचे आश्वासन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- शहरातील प्रभाग क्र. 7 मधील नागापूर - बोल्हेगाव आणि माताजी नगर मधील फेज - 2 पिण्याचे पाणी चालू करण्यात यावेत, या मागणी निवेदन दिले होते. याबाबत नगरसेवक अशोक बडे, दत्तात्रय सप्रे व शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.21) मनपा आयुक्तांशी चर्चा केली.

दरम्यान, माताजीनगरला पिण्याचे पाणी देण्यात यावेत, याबाबतही मनपा आयुक्तांशी चर्चा झाली. यात दोन दिवसांत पाणी देण्याचे आयुक्तांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले. मनपा प्रशासनाशी शिष्टमंडळाशी चर्चा सकारात्मक झाली. यावेळी पाणी पुरवठा अभियंता परिमल निकम, विजय पठारे, अमोल येवले, संग्राम कोतकर, भागचंद भाकरे आदिंसह प्रभागातील नागरिकांनी उपस्थित होते. Post a Comment

0 Comments