Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोविड रुग्णांना मोफत अन्न दान घरपोच सेवा सुरू : निभा मोदी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी - वूमन्स प्राईड चॅरीटेबल ट्रस्ट व जिम केटरर्स आणि लाईट हाऊस फाऊंडेशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने वसई परिसरातील घरी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांसाठी एक मदतीचा हात म्हणून निशुल्क जेवण्याचे डब्बे घरपोच देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. वूमन्स प्राईड चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा निभा मितेश मोदी यांनी सांगितले की, वसई परिसरातील कोविड रुग्णांसाठी निशुल्क जेवण्याचे डब्बे घरपोच देण्याचा वेळेवर देण्याचा उपक्रम या संस्थेमार्फत करण्यात येत आहे. या काळात १९ दिवसात २ हजार ४८७ डब्बे रूग्णांपर्यंत पोचवले. त्यापैकी ११४ रूगणांनी यशस्वी पणे कोरोना ला मात दिली आहे. या सामाजिक कामात सामाजिक कार्यकर्ते किंवा इतर सामाजिक संस्था रुग्णांसाठी मदत करण्यास इच्छुक असाल तर वूमन्स प्राईड चॅरीटेबल ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्षा निभा मितेश मोदी यांनी केली आहे.

संकलन : राजेंद्र दुनबळे

Post a Comment

0 Comments