Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पिवळ्या बुरशीचे नवे संकट, काय लक्षणे

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नवीदिल्ली- कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमाकोसिस म्हणजे काळी बुरशी होण्याचे प्रमाण वाढत आहे. यादरम्यानच काही दिवसांपूर्वी पांढऱ्या बुरशीची लागण झाल्याचे रुग्ण पटनात आढळले होते. यानंतर आता देशात पिवळ्या बुरशीचा पहिला रुग्ण उत्तर प्रदेशमध्ये आढळला आहे. ही पिवळी बुरशी काळ्या आणि पांढऱ्या बुरशीपेक्षा अधिक धोकादायक आणि घातक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.ज्या रुग्णात पिवळी बुरशी आढळली आहे, त्याचे वय ४५ वर्ष इतके आहे. काही दिवसांपूर्वीच हा रुग्ण कोरोनातून ठिक झाला होता. या रुग्णाला मधुमेह आहे. गाजियाबादच्या इएनटी सर्जनकडे रुग्ण उपचारासाठी गेला होता. डॉक्टरांच्या तपासा दरम्यान रुग्णांमध्ये पिवळी बुरशी आढळल्याचे समोर आले.
डॉ. बीपी त्यागी यांनी सांगितले की, ‘रुग्ण त्यांच्या क्लिनिकमध्ये आला होता. त्याला सुस्तपणा आला होता. भूक कमी लागत होती. त्याचे वजन कमी होत होते. त्याला अस्पष्ट दिसण्याचीही समस्या होती.’ डॉक्टरांनी पुढे सांगितले की, ‘आंतरिकरित्या पिवळी बुरशी सुरू होते. जसजशी ती वाढत जाते, तसतशी बुरशी अधिक घातक होत जाते.’
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गाजियाबादमधील हा रुग्ण संजय नगर भागातील राहणार आहे. त्याचे सीटी स्कॅन केल्यावर बुरशीबाबत समजले. जेव्हा रुग्णांची नेजल एंडोस्कोपी केली. तेव्हा समजले की, त्याला काळी, पांढरी आणि पिवळी अशा तिन्ही बुरशा होत्या.

👉पिवळी बुरशी होण्यामागील कारणे
डॉक्टर पुढे म्हणाले की, जर घरामध्ये जास्त आर्द्रता म्हणजेच दमटपणा असेल तर रुग्णासाठी हे घातक असू शकते. त्यामुळे याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. जास्त आर्द्रता बॅक्टेरिया आणि बुरशीचे प्रमाण वाढवते. तसेच घरातील आणि आजूबाजूची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. अस्वच्छता असणे हे पिवळ्या बुरशीच्या संसर्गामागचे मुख्य कारण आहे. शिळे अन्न खाऊ नये.


Post a Comment

0 Comments