Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दैनिक लोकमंथनचे कार्यकारी संपादक बाळकुणाल अहिरे यांंना सराईत गुंडांच्या टोळीकडून जबर मारहाण


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - शहरातील वाढलेल्या गुंडगिरीला चाप लावण्याचा प्रयत्न पोलिस करीत असले तरी आजही राजकीय छत्रछायेखाली मुजोरीपणाने गुंडगिरी करणार्‍यांवर जरब बसवण्यात पोलिसांना अपयश आले असल्याची परिस्थिती पुढे येत आहे. मागील आठवड्यात गुंडांकडुन पत्रकार मुरलीधर तांबडे यांच्या कुटुंबियंवर हल्ला करण्यात आला होता. हा तपास सुरु असतानाच मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास मागील मार्केटयार्ड जवळील माळीवाडा बसस्थानका मागील अंबर प्लाझा इमारतीच्या गेटवर दैनिक लोकमंथनचे कार्यकारी संपादक बालकुणाल अहिरे यांना सहा ते सात गुंडांकडुन मारहाण करण्यात आली आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्यासह जबर मारहाणीच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी दोघांसह अन्य सहा ते सात अनोळखी इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
शहरामध्ये कोरोना आजाराच्या वार्ताकनाकरीता मोटारसायकलवरुन पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे जात असताना काही सराईत गुंडांनी गाडीला कट मारल्याचा बनाव करुन लोकमंथनचे कार्यकारी संपादक बाळकुणाल अहिरे यांना लाथाबुक्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. ही घटना माळीवाडा बसस्थानकाच्या मागील मार्केटयार्ड जवळील अंबरप्लाझा इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की, माळीवाडा येथील जुन्या बसस्थानकाजवळील अंबर प्लाझा येथे मंगळवारी (दि.11) दुपारी  12 च्या सुमारास अहिरे हे वार्ताकनाकरीता पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे जाण्याकरीता अंबर प्लाझा इमारतीच्या गेट मधुन बाहेर पडत असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन व्यक्तींनी अहिरे यांच्या मोटारसायकलला कट मारला. यावर अहिरे म्हणाले की, माझ्या गाडीला कट का मारला? मी पत्रकार आहे.पत्रकार या नात्याने सांगतो की रस्त्याच्या रॉग साईडने गाडी चालवु नका, रस्त्यांच्या नियमांचे पालन करा, असे म्हणाताच मोटारसायकलवरील दोन इसम त्यांच्या जवळ आले  व काही ऐक कारण नसताना त्यांना शिवीगाळ करु लागले. यावर अहिरे यांनी तुम्ही शिवीगाळ करु नका असे समजावून सांगत असताना,  त्या अनोळखी दोघांनी आनोळखी पाच ते सहा जणांना फोन करुन बोलावून घेतले. या व्यक्ती आल्यानंतर सर्वांनी अहिरेंना लाथा बुक्कयांनी मारहाण केली. त्यांच्या मारहाणीत अहिरेंना तोंडावर, डोक्यात व पायांच्या मांड्यावर मार लागला. ते खाली पडले असतानाही त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण हरेत होती. यावेळी  त्यांच्या बरोबर असलेले सुनिल निमसे यांनाही गुंडांनी धक्काबुक्की करुन मारहाण केली  यावेळी अहिरे यांनी हे मी पोलिसात तुमची तक्रार करतो असे म्हंटले असता गुंडांनी त्यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेतली व तेथून निघुन गेले. अहिरे यांनी त्यांच्या मित्राकडे चौकशी केली असता. मारहाण करणार्‍यांपैकी सय्यद शकील हमीद व दुसरा लाल शर्ट घातलेला सद्दाम शकील सय्यद   (दोघे राहणार नगर) अशी  त्या गुंडाचे नावे असल्याचे समजले.
यावरुन बाळकुणाल अहिरे हे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले असता ठाणे अंमलदार यांनी अहिरे यांची तक्रार व्यवस्थीत ऐकून न घेता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली. परंतु अहिरे यांना झालेली मारहाण व त्यांना मारहाण करणार्‍या आरोपींची मगरुरीपाहता पोलिस निरीखक राकेश मानगावर यांनी अहिरे यांच्या तक्रारीची दखल घेऊन अदखलपात्र गुन्हयची नोंद रद्द करुन  महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य  व मालमत्ता नुकसान किंवा हानीप्रतिबंध) अधिनियम 2017 चे  कलम  3  व  4 प्रमाणे तसेच  गंभीर मारहाण, शिविगाळ, खुनाची धमकी, व जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदीच्या  आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, ठाणे अंमलदार वाघमारे यांनी माळीवाडा सेक्शनचे पोलिस हवालदार सोनवणे यांना आरोपीस घेवून येण्याकरीता सांगीतले असता प्रथम  आरोपी त्यांना मिळून आले  नाहीत. यावर पोलिस निरीक्षक  राकेश  मानगावकर  यांनी  कडक  भाषेत सोनवणे यांना आरोपींना  किंवा त्यांच्या जवळील व्यक्तींना पोलिस ठाण्यात हजर करण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानंतर सोनवणे यांनी अहिरे   यांना   मारहाण  करणार्‍या दोघांना  पोलिस ठाण्यात हजर केले. यामध्ये कोतवाली पोलिस ठण्याचे   गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, पोलिस अंमलदार वाघमारे पोलिस उपनिरीक्षक महाजन यांनी सहकार्य केले.
त्याच बरोबर ज्या ठिकाणी अहिरेंना मारहाण झाली त्या परिसरातील  सिसिटीव्ही   फुटेजही पोलिसांनी मिळवले आहेत. या गुन्हयचा  अधिक तपास  सहाय्यक पोलिस  निरिक्षक  हेमंत भंगाळे व पोलिस नाईक इस्त्राईल पठाण करीत आहेत.
पत्रकार आले मदतीला धावून
दैनिक लोकमंथन समुहाचे संपादक अशोक सोनवणे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना फोन करुन अहिरे यांच्या मारहाणीचा गुन्हयाचीनोंद करण्याची मागणी केली. अहिरे यांना मारहाण झाल्याचे वृत्त समजताच दैनिक लोकमंथन समुहाचे रोहित सोनवणे, प्रेसक्लबचे माजी अध्यक्ष पत्रकार राम जोशी, प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मन्सुर शेख, शांतता कमेटी सदस्य पत्रकार सुधीर पवार, अतुल लहारे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे, दै.सामनाचे मिलिंद देखने, दै.पुढारीचे केदार भोपे, अमिर सय्यद आदी उपस्थित होते.
👉आरोपींची गुर्मी पोलिस ठाण्यातही कायम
अहिरे यांना मारहाण करणार्‍या सराईत गुंन्हेगाराचे शहरामध्ये अवैध धंदे असून त्या अनुषंगाने पोलिस खात्यामध्ये त्यांचे बरेचशे लागेबांधे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिस आपल्याला काही करणार नाहीत या गुर्मीत हे गुन्हेगार पोलिसांशी बोलत होते. आपण एका पत्रकाराला मारहाण केली. याचे त्यांच्या चेहर्‍यावर कसलेही भय व चिंता दिसुन येत नव्हती. त्यामुळे या गुन्हेंगरांवर खरच कडक कारवाई होईल की नाही अशी चर्चा प्रसारमध्यमातून सुरु झाली आहे.


Post a Comment

0 Comments