Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बँकेची बनावट चेकद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार दिल्लीत जेरबंद ; एलसीबी ची कारवाई

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - वेगवेगळ्या बँकांमधून बनावट धनादेशाद्वारे कोट्यावधी रुपये काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार आरोपी याला दिल्ली येथून पकडून आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. विजेन्द्रकुमार उर्फ विजेन्द्र रघुनंदनसिंग दक्ष (वय 39 रा. एन- 2 कालकाजी दक्षिण दिल्ली) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टोळीतील सहा जणांना अटक केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, दिल्ली येथून आरोपी विजेन्द्र दक्ष याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. यानंतर आरोपी दक्ष याला महानगर दंडाधिकारी साकेत न्यायालय परिसर नवी दिल्ली यांच्या न्यायालयात हजर केले. आरोपीस दोन दिवसाची ट्रन्झीट रिमांड घेऊन त्याला अहमदनगर येथे आणून दि. 3 मे रोजी अहमदनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीची दि. 7 मे रोजीपर्यंत आरोपी दक्ष याला पोलीस कोठडी मंजुरी दिली आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातील या प्रकारे विविध गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यासाठी पुढील तपास सपोनि मिथुन घुगे हे करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि मिथुन घुगे, पोना सचिन आडबल, विशाल दळवी, लक्ष्‍मन खोकले, पोकाॅ रोहित येमुल, चापोहेकाँ उमाकांत गावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments