Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नैऋत्य मॉन्सून २१ मे पासून सुरु होणार ! येत्या ४ आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई- अरबी समुद्रात तयार झालेले तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक राज्यांना तडाखा बसला. हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार, यावर्षी मान्सून निश्चित तारखेच्या अगोदर केरळात दाखल होणार आहे. उद्या (दि.२१ मे ) पासून देशात मान्सून दाखल होईल. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा मार्ग मोकळा झाला असून, त्यामुळे येत्या ४ आठवड्यांमध्ये काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उद्या ( २१ मे) शुक्रवारी नैऋृत्य मोसमी वारे अंदमान बेटावर पोहचणार आहेत. त्यानंतर १ जूनला हे वारे केरळमध्ये दाखल होणार आहेत.


या पार्श्वभूमीवर येत्या ४ आठवड्यात केरळ किनारपट्टी,कर्नाटक,तमिळनाडूमध्ये सरासरीपेक्षी जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एक आठवड्यात बंगालच्या उपसागरात आणि उत्तर पूर्व भागातील राज्यांमध्येही पावसाचा जोर कायम राहिल. त्याचप्रमाणे दक्षिण भारत,पूर्व मध्य भारत,उत्तर पूर्व भारतातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम किनारपट्टी, पुर्व उत्तर प्रदेश, बिहारमध्येही येत्या ३ ते ४ आठवड्यात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दक्षिण अंदमान समुद्रात नैऋृत्य मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे सॅटेलाईट इमेजमधून दिसत आहे. भारतीया हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे वारे २१ मे रोजी अंदमान समुद्रात जाण्याची शक्यत आहे.
१ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर १० जूनपर्यंत मान्यून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर १५ ते २० जून पर्यंत उत्तर महाराष्ट्रात मान्यून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


Post a Comment

0 Comments