Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तृणमूल कॉंग्रेसने घवघवीत यश ; ममता बॅनर्जी यांचा पराभव

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कोलकत्ता : बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने घवघवीत यश मिळवले आहे. पण नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजप उमेदवार शुभेंद्र अधिकारी व ममता बॅनर्जी यांच्यात रविवारी (दि.2) सकाळपासूनच अटी-तटीचा सामना पाहायला मिळात होता. सुरुवातीला ममतादीदी जिंकल्या असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण, परत फेरमतमोजणी केल्यानंतर भाजपचे उमेदवार शुभेंद्र अधिकारी विजयी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासून शुभेंद्र अधिकारी हे आघाडीवर होते. मात्र, संध्याकाळी अचानक चित्र पालटले आणि ममतादीदींनी आघाडी घेतली. तसेच काही वेळापूर्वी १२०० मतांनी ममतादीदींना विजयी घोषित करण्यात आले होते. ममतादीदी विजयी झाल्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण देखील पाहायला मिळत होते. परंतु शुभेंद्र अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणी करण्याची मागणी केली. व या फेरमतमोजणी मध्ये शुभेंद्र अधिकारी हे विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा  पराभव झाला आहे. परंतु त्यांनी त्यांचा हा पराभव अमान्य केला.  त्यांनी जिल्हाधिकार्यांना भेटून पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली असल्याची माहिती सध्या मिळत आहे. तसेच त्यांनी या निकालाविरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचे देखील सांगितले आहे.
शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा  पराभव झाला आहे. मात्र निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे.

Post a Comment

0 Comments