Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

क्लोन केलेल्या एटीएम कार्डच्या माध्यमातून लाखोंची फसवणूक, दोघे अटक ; सायबर व भिंगार कॅम्प पोलिसांची संयुक्त कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - एटीएम कार्ड क्लोन करून 'लाखो' ची रक्कम एटीएम मशीनच्या माध्यमातून काढून फसवणूक करणाऱ्या दोन उच्चशिक्षित आरोपींना मोठ्या शिताफीने पकडण्यात सायबर व भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले आहे. धीरज अनिल मिश्रा (वय 30), सुरज अनिल मिश्रा (वय 22 रा. नायगाव, मुंबई) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की दि.11 मे रोजी एटीएम कार्ड क्लोन करून एटीएम बनवून त्याद्वारे वेगवेगळ्या एटीएममध्ये वापर करून 20 हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्याचा सायबर पोलिस ठाणे व भिंगार कॅम्प पोलिसांच्या संयुक्त पथकाने एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपींचा शोध लावला. आरोपींचा शोध लावला असता, त्यांना नगर कल्याण रोडने पाठलाग करून त्यांना टोकावडे (ता. ठाणे) येथे दोघांना पकडण्यात आले. आरोपी धीरज मिश्रा व सूरज मिश्रा यांना पोलिस खाक्या दाखविताच गुन्ह्याची गुन्हा केल्याची कबुली दिली. दोघा आरोपींविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 465, 468, 471, 474, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी)(डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, दि. 19 मे पर्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सायबरचे पोनि राजेंद्र भोसले हे करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि राजेंद्र भोसले, सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोसई प्रतिक कोळी, पोहेकाॅ योगेश गोसावी, गोविंद गोल्हार, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, पोना राहुल द्वारके, पोकाॅ गणेश पाटील, राहुल गुंडू अभिजीत अरकल, मपोना खताळ, चापोहेकाँ वासुदेव शेलार आदींच्या सायबर व पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments