Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रात्री थांबलेल्या वाहनांतील चालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद ; 'एलसीबी'ची कारवाई


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या वाहनांतील चालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणारी टोळी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. स्वप्निल उर्फ आदित्य अशोक पाखरे (वय 25 रा. नागरदेवळे ता. जि अहमदनगर), किशोर उर्फ ईश्वर दिलीप शिंदे (वय 24 रा. देहरे ता.जि अहमदनगर), महेश मनाजी उर्फ मनोहर शिंदे ( वय 28 रा. विळद ता.जि अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
राञी शेंडी शिवारातील बायपास चौफुला चौफुला येथे एलसीबी पथकाने सापळा लावला. दरम्यान विना नंबरच्या दुचाकीवर आलेल्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या टेम्पोचा दरवाजा उघडून चालकाच्या गळ्यास कोयता लावून पैशाची मागणी करीत असताना एलसीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना पकडण्यासाठी अचानक झडप घातली. यावेळी अंधाराचा फायदा घेत एक चोर पळून गेला. उर्वरित आरोपी पाखरे व शिंदे याना पकडण्यात आले. पळालेला आरोपीची माहिती घेऊन महेश शिंदे याला विळद येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी स्वप्निल पाखरे याच्यावर भिंगार कॅम्प, तोफखाना, एमआयडीसी, कोरेगाव पार्क, दौंड रेल्वे, संगमनेर शहर, पिंपरी-चिंचवड व कोतवाली पोलिस ठाणे येथे एकूण 19 गुन्हे दाखल आहेत. आरोपी किशोर शिंदे याच्यावर एमआयडीसी व नगर तालुका पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी आकाश शिंदे याच्यावर दौंड, एमआयडीसी, तोफखाना, नगर तालुका पोलिस ठाण्यात एकूण 10 गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, मिथुन घुगे, पोसई गणेश इंगळे, सफौ मन्सूर सय्यद, पोना संदीप पवार, सुरेश माळी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, पोकाॅ सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, शिवाजी ढाकणे, रोहित येमूल, रणजीत जाधव, योगेश सातपुते, चापोहेकाँ संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली

Post a Comment

0 Comments