Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यावर अस्मानी संकट- देवा भताने

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
राज्यात एकीकडे कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असून दुसरीकडे अस्मानी संकटामुळे बळीराजा मात्र पूर्णतः हतबल झाला आहे.


राज्यात जवळपास आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी,वादळ, गारपीठ व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.यात शेतकऱ्यांच्या कांदा, डाळींब, टोमॅटो, द्राक्षे, कलींगड, कोथिंबीर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अगोदरच कोरोनामुळे शेतमालाला भाव मिळत नव्हता त्यात निसर्गाच्या लहरीपनाचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.शेतकरी नेहमीच अडचणीत असतो त्याच्या अडचणी कधीच न संपणाऱ्या असूनसुद्धा तो कधीच हार मानत नाही ही वस्तुस्थिती आहे. महागाईनेही कळस गाठला असून शेतकऱ्यांना उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्चच अधिक होत आहे .संघर्ष हा नेहमी त्याच्या पाचवीलाच पुजलेला…त्याचा कधी निसर्गाच्या लहरीपनाशी संघर्ष, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाशी संघर्ष, कधी खराब हवामानाशी संघर्ष, खते, औषधं यांच्या भरमसाठ किंमतीशी संघर्ष, व्यापारी व ग्राहकांशी संघर्ष, बाजारभावाशी संघर्ष,कधी सरकारच्या चुकीच्या धोरणाशी संघर्ष.तर कधी स्वतःशीच संघर्ष. कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत शेतकरी आर्थिक दृष्टीने सक्षम आहे का? हा प्रश्न आपल्याला का पडू नये.सद्या दुध व्यवसायाची काय परिस्थिती आहे.दुधाचे दर कमी झाले तरी पशुखाद्य व औषधं तसेच दुधापासून तयार होणारे उपपदार्थ पेढे,दही, ताक, लस्सी श्रीखंड, यांचे दर कमी का होत नाहीत?प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनीच झळ का सोसायची ?शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा कुठेतरी अंत होणं गरजेचं आहे.त्यासाठी होतकरू तरुण शेतकऱ्यांनी एकजुटीने कायदयाच्या चौकटीत राहून लढले पाहिजे या मताचा मी आहे.शेतकरी हा फक्त इतर वस्तूंच्या वाढलेल्या किंमतीनुसार त्याच्या शेतमालाचे श्रमाचे चार पैसे मागतो.तो काही सरकारला वेतन अयोग लागू करायला सांगत नाही.सरकारलाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अयोग समित्या यांची आवश्यकता का पडावी? शेतकरी कुटुंबातील नेते नाहीत की काय सरकारमध्ये?सरकार व व्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्यासाठी व्यवस्था बदल खुप महत्वाचा असतो.व्यवस्था बदल हा एका रात्रीत होत नसतो त्यासाठी त्याला जनतेच्या सहनशीलतेचा बांध फोडणारा आवाज असावा लागतो शेतकऱ्यांनी तो आवाज निर्माण करण्याची खरी वेळ आता आली आहे.आपली अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे आहे.जवळपास 70% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. कोरोनाच्या काळातदेखील अर्थव्यवस्था सांभाळणारा शेतकरीच होता. मग शेती क्षेत्राचा स्वतंत्र अर्थसंकल्प का मांडू नये अशी प्रभावी मागणी आपली इथून पुढील काळात असली पाहिजे.असंख्य दुःखाचे काटे आहेत त्याच्या वाटेवर, सरकारला काय माहित त्यासाठी किती भेगा पडतात शेतकऱ्यांच्या टाचेवर…
(सर्व सामान्य शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य. संस्थापक अध्यक्ष प्रताप काका ढाकणे )

Post a Comment

0 Comments