Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन : जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- देशातील नागरिक एकीकडे कोरोनाशी सामना करत असतानाचा दुसरीकडे महागाईशी संघर्ष करत आहेत. अशा परिस्थिती मध्ये सुद्धा केंद्र सरकार वारंवार महागाई मध्ये वाढ करून सर्वसामान्य माणसाचे जनजीवन विस्कळित करण्याचे काम करत आहे. केंद्र सरकार वारंवार पेट्रोल, डिझेल, गॅस यांची भाववाढ करत आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले आहे? सोमवारी ( दि.17) आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पेट्रोलने शंभरी पार केली आहे तर १०.२६.२६ ची किंमत तब्बल ६०० रुपयांनी वाढली आहे. डी.ए.पी.ची किंमत ७१५ रुपयांनी वाढली आहे. इतर खतांच्या किमती सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला या महागाईमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. केंद्र सरकारची ही भाववाढ हाणून पाडण्यासाठी, या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना उद्या दुपारी एक वाजता निवेदन देऊन महागाई विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत हे आंदोलन जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने होणार आहे. 

Post a Comment

0 Comments