Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राशीन मधील बनसोडे पाटील परिवाराकडून पोलीस दलास कोरोना प्रतिबंधक गोळ्या व औषधाचे वाटप

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत :- कोरोनाच्या भीषण काळात स्वतःच्या जीवाची व परिवाराची काळजी न करता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व संरक्षणासाठी दिवस रात्र डोळ्यात तेल घालून तैनात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे, गेल्या वर्षापासून कोरोना काळात सतत वेळी अवेळी जनतेच्या रक्षणासाठी सतत अग्रेसर होत प्रामाणिकपणाने कर्तव्य बजावणारे कर्जत तालुक्यातील राशीन पोलीस दूरक्षेत्राच्या सर्व पोलीस यंत्रणा व त्यांच्या कुटुंबांना निरोगी संरक्षणासाठी कोरोना काळात प्रतिबंधक उपाय म्हणून राशीन येथील दीपक स्टोअर्सच्या बनसोडे पाटील परिवाराकडून विटामिन सी, विटामिन डी, झिंक गोळ्या तसेच मास्क, सॅनिटायझरचे मोफत वाटप  कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गट विकास अधिकारी अमोल जाधव व नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या उपस्थित करण्यात आले.

 यावेळी राशीन दूरक्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल सातपुते, एमजी काळे, पो. कॉन्स्टेबल भागडे, बी आर काळे, गणेश ठोंबरे, मेहेत्रे, एस जी शिंदे एस एम वारे व इतर पोलीस मित्र उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments