Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जदारांना रिझर्व्ह बँकेने दिलासा

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नवी दिल्ली: कोरोना संकटकाळाने आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जदारांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला आहे. छोट्या कर्जदारांना कर्जफेडीसाठी दिलासा देण्याचे बँकाना निर्देश देण्यात आले आहेत. 
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) कोरोना संकटाच्या काळात अर्थव्यवस्था सावरण्यासाठी बुधवारी नव्या उपायांची घोषणा केली. यात कोरोनामुळे त्रस्त व्यावसायिक, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या कर्जांच्या पुनर्गठनाचा समावेश आहे. तसेच छोट्या कर्जदारांना कर्जफेडीसाठी जास्त मुदत द्यावी, असेही बँकांना सांगण्यात आले आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, 25 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज असणार्‍या युनिटच्या थकीत कर्जाच्या पुनर्गठनाचा विचार केला जाईल. ज्यांनी पूर्वी एखाद्या पुनर्गठन योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि ज्यांची कर्ज खाती 31 मार्च 2021 पर्यंत चांगली होती, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
त्याचबरोबर छोट्या बँकांसाठी 10 हजार कोटींच्या 3 वर्षांच्या दीर्घकालिक रेपो ऑपरेशनचीही घोषणा आरबीआयने केली. यामुळे एसएमईंना 10 लाखांपर्यंतची मदत प्राधान्य क्रमाच्या क्षेत्रासाठी कर्ज समजली जाईल. आरबीआयने बँका व इतर वित्तीय संस्थांना सांगितले की, केवायसी अपडेट न करणार्‍या ग्राहकांविरुद्ध 31 डिसेंबरपर्यंत बंदी आणू नये.

Post a Comment

0 Comments