Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कॉलगर्लला भारतात आणण्यामागे सेक्स रॅकेट

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नवी दिल्ली : जगभरात सेक्स रॅकेटचे अनेक व्यवसाय सुरु आहेत. कोरोनाच्या काळातही सेक्स रॅकेट जोरात सुरु असल्याचे दिसून आले आहे. लखनऊमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लखनऊमधील एका व्यापाराच्या मुलाने थायलँडमधील एक कॉलगर्ल भारतात बोलवली. त्याने तिला तब्बल ७ लाख रुपयांना विकत घेतले. एका एजेंटच्या मार्फत ही कॉलगर्ल भारतात आली. ७ लाखात अवतरलेल्या कॉलगर्लची लखनऊमध्ये येताच तब्येत बिघडली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र भारतात येताच दहाव्या दिवशीच कॉलगर्लचा मृत्यू झाला. कॉलगर्लला भारतात आणण्यामागे सेक्स रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कॉलगर्ल राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका ट्रॅव्हल एजेंटच्या संपर्कात होती. त्यानेच तिला थायलँडवरुन आल्यानंतर लखनऊला पोहचवले होते. पोलीस या एजेंटचा तपास करत आहेत. त्याचप्रमाणे कॉलगर्ल थायलँडवरुन येताच कोरोना पॉझिटिव्ह होती. कॉलगर्लची तब्येत अचानक बिघडल्याचे कळल्यावर ज्या व्यापाराच्या मुलाने कॉलगर्लला ७ लाखांना विकत घेतले त्याने थायलँड एँबेसीला फोन करुन सर्व माहिती दिली. एँबेसीने भारत विदेश मंत्रालयाला फोन करुन कॉलगर्लला रुग्णालयात दाखल करण्यात सांगितले.
कॉलगर्लचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी थायलँड एँबेसीला फोन करुन कॉलगर्लच्या नातेवाईकांनी मृतदेह देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ज्या एजेंटच्या मार्फत ती भारतात आली होती त्या एजेंटच्या उपस्थितीत कॉलगर्लवर अंतिमसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे थायलँडवरुन आलेली कोरोना पॉझिटिव्ह कॉलगर्ल कोणा कोणाच्या संपर्कात आली होती याचाही पोलीस शोध घेत आहेत.


Post a Comment

0 Comments