Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगावात लाच मागणा-या तिन्ही पोलिसांवर अखेर गुन्हा दाखल ; अहमदनगर एसीबीची कारवाई

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. याप्रकरणी शेवगाव-पाथर्डीच्या तीन पोलिस कर्मचा-यांवर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोकाॅ वसंत कान्हु फुलमाळी ( वर्ग 3 नेमणूक -उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव यांचे वायरलेस ऑपरेटर ( RTPC ) रा. शंकरनगर पाथर्डी, जि. अहमदनगर), पोकाॅ संदिप वसंत चव्हाण (वर्ग-3, नेमणूक - पाथर्डी पोलीस स्टेशन, सध्या संलग्न उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक रा. पोलीस वसाहत शेवगाव, जि. अहमदनगर), पोकाॅ कैलास नारायण पवार ( वर्ग -3, नेमणूक-शेवगाव पोलीस स्टेशन, सध्या संलग्न - उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक. रा. शंकरनगर, पाथर्डी) ही गुन्हे दाखल झालेली तीन पोलिस कर्मचारी आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची वाळूची ट्रक उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील कार्यरत तिन्ही लोकसेवक यांनी दि.7 एप्रिल 2021 रोजी पकडली. त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याचे मोबदल्यात व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून दि.7 एप्रिल 2021 रोजी आयोजित लाच मागणी केली. या पडताळणी कारवाई दरम्यान तिन्ही लोकसेवक यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाच मागण्याची व घेण्याचे सिद्ध झाल्याने तिन्ही पोलिसांवर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी लोकसेवक फरार झाले असून, त्यांचा शोध चालू आहे.
नाशिक ला.प्र.वि चे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, वाचक पोलीस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ला.प्र.वि.अहमदनगरचे पो.नि.श्याम पवरे यांच्या सूचनेनुसार नगरच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments