Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बारामती लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बारामती - जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे सोमावारी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी संभाजीराव काकडे यांची ओळख होती. १९७१ साली विधान परिषदेवर पहिल्यांदा त्यांची निवड झाली होती. तर १९७७ मध्ये जनता लाटेत बारामती मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतरही एकदा पोटनिवडणुकीत त्याच मतदार संघातून ते विजयी झाले होते. जनता पक्ष तसेच जनता दलाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
बारामती तालुक्यातील निंबुत येथील एक वजनदार घराणे म्हणून काकडे यांचा लौकिक होता. १९६७ साली काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते. तसेच, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या निकटच्या सहकाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखलं जायचं. मागील वर्षभरापासून काकडे हे आजारी होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Post a Comment

0 Comments