Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दया नायक गोंदियाला, तर कोथमिरेंची गडचिरोलीत बदली


ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई - राज्यातील अप्पर पोलीस आयुक्त तसेच अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आले आहेत. राज्य पोलीस गृह निर्माण आणि कल्याण महामंडळाच्या अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांची अप्पर पोलीस महासंचालक लोहमार्ग मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांना विशेष अभियान येथे बदली करण्यात आली आहे. तसेच राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या सातजणांची बदली विविध जिल्ह्यात करण्यात आली आहे.

तर कोथमिरे गडचिरोलीत

मुंबईतील चार अधिकार्‍या पाठोपाठ चकमक फेम दया नायक यांची राज्य दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथून थेट गोंदिया जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबई गुन्हे शाखेचे टॉपचे अधिकारी पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, नंदकिशोर गोपाळे, सचिन कदम आणि केदारी पवार यांची मुंबई बाहेर बदली केल्यानंतर गुरुवारी चकमक फेम यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने दिले आहे. दया नायक यांची गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग याठिकाणी बदली दाखवण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांची बदली करण्यात आली असून त्यांची गडचिरोली येथे करण्यात आली आहे. राजकुमार कोथमिरे हे चकमक फेम प्रदीप शर्मा यांच्या सोबत ठाणे खंडणी विरोधी पथकात होते.Post a Comment

0 Comments