Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोनामुळे अखेर आयपीएल स्थगित ; 'बीसीसीआय' ला हजारो कोटींचे नुकसान खेळडूसह स्टाफला कोरोनाची लागण

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता, आयपीएल स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 7 खेळाडूंबरोबरच तेथील कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह अन्य कारणास्तव आयपीएल रद्द करावे अशी मागणी सगळीकडून केली जात होती. त्याच अनुषंगाने भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीही फेब्रुवारीत पाकिस्तानात 'पीएसएल' ला प्रारंभ झाला होता. परंतु यावेळी 6 खेळाडूंसह 8 जण कोरोना संक्रमित झाले होते. तेव्हा पाकिस्तानने अचानक पीएसएल थांबविण्याचा निर्णय घेतला. पण, आयपीएलमध्ये 7 क्रिकेटर्सला कोरोना झाल्यानंतरही बीसीसीआय कसली वाट पाहत आहे, असा सवाल उपस्थित केला जात होता. तत्पूर्वी आयपीएलचे सामने एकाच ठिकाणी मुंबईतील 3 मैदानांवर घेणार अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, वाढत्या दबावानंतर अखेर आयपीएल सामना रद्द करावा आहे.
एका अहवालानुसार वहाला, चेन्नईचे बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजीसह दोन स्टाफ मेंबर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याशिवाय, किंग्स इलेवन पंजाबमधील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे येत आहे. आरपीएल मध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. 'केकेआर' चा वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी, नीतीश राणा (केकेआर), अक्षर पटेल (डीसी), डेनियल सैम्स (आरसीबी), एनरिक नॉर्खिया (डीसी) आणि देवदत्त पडिक्कल (आरसीबी) ला कोरोनाची लागण झाली आहे.Post a Comment

0 Comments