Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'एअर इंडिया'च्या सर्व्हरवर सायबर हल्ला ; डेटा चोरीला


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नवीदिल्ली- सरकारी एअर लाईन्स कंपनी एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचे उघड झाले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये ४५ लाख प्रवाशांचा असणारा डेटा चोरीला गेला आहे. यात प्रवाशांची वैयक्तिक माहिती असून प्रवाशांचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, पासपोर्टची माहिती, तिकिटबाबत असणारी माहिती चोरीस गेली आहे.

एअर इंडियाच्या माहितीनुसार, प्रवाशांच्या डेटा ठेवण्याचे काम सीटा पीएसएस कंपनी करते. या कंपनीच्या सिस्टममधून ४५ लाख प्रवाशांची माहिती लीक झाली आहे. २६ ऑगस्ट २०११ ते ३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान प्रवास केलेल्या प्रवाशांची माहिती लीक झाली आहे. यामध्ये प्रवाशांचे नाव, जन्म तारीख, मोबाईन नंबर, पासपोर्ट नंबर, क्रेडिट कार्ड या सर्वांचा समावेश आहे. पण प्रवाशांच्या सीवीवी आणि सीवीसीची माहिती सुरक्षित असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments