Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वृत्तपत्र स्वतंत्रता दिननिमित्त प्रताप ढाकणे यांच्याकडून पेपर वितरण करणाऱ्यांना मदतीचा हात

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथडीॕ- वृत्तपत्र स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॕड.प्रतापराव ढाकणे यांच्याकडून शहरात घरोघरी जाऊन पेपर वितरित करण्याचे काम करणारे व कोरोनामुळे अडचणीत असणाऱ्यांना एक महिन्याचे किराणा साहित्य भेट देण्यात आले.ढाकणेंच्या भेटीमुळे सर्व वृत्तपत्र वाटणाऱ्यांना गहिवरून आले व या संकटाच्या काळात मदत केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
 दि.3 मे रोजी वृत्तपत्र स्वतंत्रता दिन साजरा केला जातो.त्याच दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॕड.प्रतापराव ढाकणे यांनी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जोपासत शहरातील घरोघरी जाऊन वृत्तपत्रे वितरीत करण्याचे काम करणाऱ्या व बहुतेक जणांचा तेच उदरनिवाॕहाचे साधन असणाऱ्या सवाँना व कोरोनामुळे आथिॕक विवंचनेत सापडलेल्या वितरण करणाऱ्यांना एक महिना पुरेल इतके किराणा सामान ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री,प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर,पत्रकार राजेंद्र सावंत,सचिन दायमा,अनिल खाटेर व राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी देवा पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री म्हणाले,समाजातील दुर्लक्ष होत असलेला घटक म्हणून पेपर वाटणारे असतात.रोज पहाटेपासून लोकांच्या घरोघरी ! जात वृत्तपत्र वाटतात मात्र या घटकाकडे आजपर्यंत कुणाचेही लक्ष गेले नाही.मात्र अॕड.प्रताप ढाकणे यांनी या सगळ्यांच्या अडचणीची दखल घेत त्यांना केलेली मदत ही अतिशय मोलाची ठरेल.साहित्य किती आहे यापेक्षा ढाकणेंनी या सवाँसाठी दाखवलेली कणव महत्त्वाची मानली पाहीजे.कोरोना सूरू झाल्यापासून ढाकणे कुटूंबिय कशाचीही पवाॕ न करता आज जनतेच्या सेवेत कार्यरत आहे.पेपर वाटणारा घटक अतिशय छोटा असतो मात्र त्यांनाही मदतीची भावना ठेवणे हे प्रतापरावांची सजग संवेदनशिल व्यक्तीमत्वाचे दशॕन घडविते.कोविड सेंटर,वंचित,दुर्लक्षीत घटकांना संकटसमयी मदत हे ढाकणेंचे कार्य गेल्या एक वषाँपासून सूरूच आहे.आज वृत्तपत्र क्षेत्रातील छोट्यांना सहकार्य केल्याबद्दल सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांचे आभार मानतो.प्रास्तविक देवा पवार यांनी केले तर आभार सचिन दायमा यांनी मानले.

Post a Comment

0 Comments