Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

म्युकरमायकोसिस रुग्णांचा अहवाल मनपा व शासनाकडे दया- महापौर बाबासाहेब वाकळे

 

मनपा आरोग्यसमिती व शहरातील डॉक्टरांची बैठक महापालिकेत संपन्न
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - नगर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णां बरोबर आता म्युकर मायकोसिसचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणात आढळत आहे.याची माहिती शासनाकडे अहमदनगर महापालिके कडे असणे गरजेचे आहे यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू याचबरोबर कोरोनाविषाणू संसर्गची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञ सांगत आहे.यामध्ये सर्वाधिक लहान मुले बाधित होणार असल्याचा निकष समोर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी लवकरच महापालिका बालरोग तज्ज्ञांची बैठक घेऊन उपाय योजना केल्या जाणार आहे. लवकरच शहरामध्ये महापालिकेच्या १५० बेडचे ऑक्सिजन कोविड सेंटर उभारले जाणार आहे. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी महापालिका स्वतःचा ऑक्सीजन प्लांट उभा करणार असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
मनपा आरोग्य समिती व शहरातील कोरोना कोविड सेंटर यांच्या संयुक्त बैठकीत महापौर बाबासाहेब वाकळे बोलत होते.यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, सभागृहनेते रवींद्र बारस्कर,सदस्य निखिल वारे,सदस्य सतिष शिंदे, सदस्य सचिन शिंदे,लेखापरीक्षक प्रदीप मानकर,इंजी.आर.जी.मेहत्रे आदींसह डॉक्टर उपस्थित होते.
यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे म्हणाले की, शहरातील कोविड कोरोना सेंटरचे सर्व डॉक्टर व मनपा आरोग्य समिती एकत्रितपणे काम करून कोरोना बाधित रुग्णांना दिलासा देऊ या, कोरोना कडे संधी म्हणून पाहू नका तर सेवा म्हणून पाहावे डॉक्टरांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम आम्ही करू,मात्र तुमच्या सहकार्याची खरी गरज आहे. लवकरच आरोग्य समितीच्या वतीने आ.संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊ व प्रश्न मांडू मात्र तुम्ही रुग्णांची अडवणूक न करता रुग्णांना वैद्यकीयसेवा द्यावी शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे बिलांची आकारणी करावी असे प्रतिपादन नगरसेवक डॉ सागर बोराडे यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना पुढे आरोग्य समितीचे सदस्य निखिल वारे म्हणाले, अडीअडचणीच्या काळात मनपा चांगले काम करत आहे. जिल्ह्यातील रुग्णांची मनपाच्या माध्यमातून बूथ हॉस्पिटलचे बिल मनपाने भरले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्याचा खर्चही मनपा करत आहे.कोरोना काळात मनपा कोविड सेंटर कुठलाही गाजावाजा न करता चांगले काम करत आहे.रेमडेसिविरचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मात्र काही हॉस्पिटलचे कर्मचारी रेमडीसिविरचा काळा बाजार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढील काळात जर कोणी असे प्रकार केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, पुढील काळात चांगले नियोजन करून अधिक चांगली आरोग्य सुविधा कशी देता येईल यासाठी मनपा आरोग्य समिती प्रयत्नशील राहील.
यावेळी नगर शहरातील विविध डॉक्टरांनी आपल्या अडी-अडचणी मांडत म्हणाले की, नगर शहरामध्ये लसीकरणाला गती द्या त्यामुळे पुढील काळात कोरोनाचा संसर्ग कमी होईल याच बरोबर या झालेल्या मीटिंगमध्ये काहीतरी निर्णय होईल असे दिसते. लेखापरीक्षक प्रदीप मानकर म्हणाले की, शासनाच्या निर्देशानुसार कोरोना रुग्णांची बिले घ्यावीत, काही अडचणी असल्यास संपर्क साधावा.
यावेळी सर्वांचे आभार सदस्य सतीश शिंदे यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments