Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

..राजकीय वळण देऊ नका. उगाच रुग्णांच्या जीवाशीही खेळू नका ; राजकीय पक्षांना औरंगाबाद खंडपीठाने फटकारले
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
औरंगाबाद - व्हेंटिलेटरच्या मुद्यावरून रान उठवणार्‍या राजकीय नेत्यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगलेच झापले आहे. तुम्ही तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे व्हेंटिलेटर्सचा दर्जा ठरवून या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका. उगाच रुग्णांच्या जीवाशीही खेळू नका, अशा शब्दात औरंगाबाद खंडपीठाने केंद्र सरकारने दिलेल्या व्हेंटिलेटर्सवर टीका करणार्‍या राजकीय पक्षांना फटकारले आहे.

औरंगाबाद खंडपीठात कोरोनाप्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने राजकारण्यांना खडेबोल सुनावले. तुम्ही व्हेंटिलेटरमधील तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे त्याचा दर्जा ठरवू नका. व्हेंटिलेटरचा दर्जा तज्ज्ञांना ठरवू द्या. या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका. उगाच रुग्णांच्या जीवनाशी खेळू नका, अशी तंबीच कोर्टाने राजकारण्यांना दिली.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला पीएम केअर्स फंडातून 150 व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मात्र, हे व्हेंटिलेटर खराब असल्याचा आरोप आघाडीतील नेत्यांनी केला होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या व्हेंटिलेटर्सवर प्रश्नचिन्हे उपस्थित केले होते. त्याकडे याचिकेद्वारे कोर्टाचे लक्ष वेधण्यात आले होते. त्यावर कोर्टाने राजकारण्यांचे कान उपटले आहेत.
काँग्रेसने पीएम केअर्स फंडातील व्हेंटिलेटर खराब असल्याचा दावा केला होता. पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर्स तकलादू आहे. त्यासंदर्भात सुरू असलेली सारवासारवही उघड झाली आहे. औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 17 मेच्या अहवालाने केंद्र सरकार, तसेच गुजरात भाजपच्या नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडलाय. अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून राज्याला दिलेल्या सर्व व्हेंटिलेटर्सची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती.
Post a Comment

0 Comments