Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जुगार अड्ड्यावर छापा ; नगर शहर डीवायएसपी पथकाची कारवाई

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - कल्याण नाईट मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी दि.4 मे रोजी सायंकाळी छापा टाकून 2 हजार 70 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई नगर शहर डीवायएसपी विशाल ढुमे यांच्या पथकाने केली. 
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार श्री ढुमे यांनी पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने अहमदनगर शहरातील पिंजरगल्ली रिअल कलेक्शन शेजारील सुरू असणाऱ्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यादरम्यान छाप्यात राजू गफूर शेख (रा. पिंजरगल्ली,अहमदनगर), सलीम मुसा शेख (रा. घासगल्ली, कोठला, अहमदनगर) या दोघांसह मुद्देमाल ताब्यात घेतला. पकडण्यात आलेल्या दोघांवर कोविड काळातील आदेशाचे उल्लंघन केल्याचा व भादविक 188, 269 सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या सूचनेनुसार पोना हेमंत खंडागळे, पोकॉ सागर द्वारके व शहर स्ट्रायकिंग फोर्सने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments