Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

देणाऱ्यांचे हात हजार.... दुबळी माझी झोळी... देणाऱ्याने देत जावे.. घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता एक दिवस घेणाऱ्याने देणाराचे हातच घ्यावे...

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- नुकतेच श्री रत्न जैन विद्यालय माणिकदौंडी येथे लोक समाजातून माणिकदौंडी पंचक्रोशी कोवीड केअर सेंटरचे उद्घाटन प्रांतअधिकारी देवदत्त केकाण यांचे हस्ते तर तहसीलदार शाम वारकड, पाथर्डी पंचायत समिती गटविकास अधिकारी शितल खिंडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. 

गेल्या वर्षभरा पासून कोरोना या आजाराशी लढता लढता आमच्या ग्रामीण भागातील जनता अगदी मेताकुटीस आली त्यात आता कोरोणाची दुसरी लाट आली खेडया पाडयांनी आणि तांडया वस्त्यावर कोरोणा रूग्णाची वाढणारी संख्या मात्र चिंताजनक होती. रुग्ण पॉझीटीव्ह निघाला की तालुक्याच्या ठिकाणी अॅडमिट व्हावं लागायचं त्यात हॉस्पीटलमध्ये बेड शिल्लक नाही, ऑक्सीजन नाही आणि होणारी हेळसांड व गैरसोय याबाबत परिसरातील नागरीकांनी आणि काही बरे होऊन आलेल्या रुग्णांनी सांगितलेली हकीगत....
काही झाले तरी चालेल परंतु परिसरातला माणूस वाचला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आज लोक सहभागातुन माणिकदौंडी येथे कोवीड केअर सेंटर उभा राहीलं...
आमच्या घाट माथ्यावरील ग्रामीण भागातील समाज शेतमजूर आणि उसतोडणी कामगारांचा भाग एरवी छोट्या मोठया कामात व्यस्त असलेला परिसर लोकवर्गणी मधून परिसरातील लोकांसाठी कोवीड सेंटर उभा करतो म्हणजे त्यांच कौतुक करावं तेव्हडं कमीच...
सामाजिक कार्याची आवड असणारे माणिकदौंडीचे उपसरपंच समीर पठाण सर आणि एक उत्तम प्रशासक असलेले माणिकदौंडी सजाचे तलाठी मेरड भाऊसाहेब यांच्या संकल्पनेतून याची उभारणी सुरु झाली माणिकदौंडी ग्रामपंचायत कार्यालयात चर्चासत्र झाले परिसरातील निवृत्त सहा. निबंधक के.सी. राठोड यांनी ५० हजार रुपये देणगी दीली माणिकदौंडी मेडिकल असो. ५१ हजार रु., उपसरपंच समीर (सर) पठाण, २५ हजार रु., आल्हणवाडीच्या सरपंच माणिषा प्रल्हाद कर्डीले २५ हजार रु., चितळवाडी सरपंच संजय चितळे ११ हजार रु., आल्हणवाडी उपसरपंच परमेश्वर गव्हाणे ५ हजार रु., शिरसाठवाडी सरपंच अविनाश पालवे १ क्वींटल साखर आणि ५० बिसलरी बॉक्स, माणिकदौंडी येथील सर्व किराणा व्यवसायिक तसेच परिसरातील स्वस्थ धान्य दुकानदार यांनी पण मदत केलीआणि बघता बघता कोवीड सेंटर उभा राहीलं...
जो पर्यंत कोवीड सेंटर चालू राहील तो पर्यंत पिण्याचे शुद्ध पाण्याची व्यवस्था ग्रा.पं. सदस्य रमीज पटेल तर चहापाण्याची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुनिल पाखरे यांनी केली..
या कार्यक्रमास पंचायत समिती गटनेते सुनिल ओहळ, जेष्ठ नेते शिवाजी मोहीते पा. तसेच परिसरातील दहा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
माणिकदौंडी कोवीड सेंटर हे परिसरातील लोकांनी लोकवर्गणीमधून उभा केले आहे. तेव्हा परिसरातील नागरीकांनी शक्य होईल तेवढी मदत देणगी स्वरूपात द्यावी, असे आवाहन करण्यात येते.

Post a Comment

0 Comments